दुहेरी हत्याकांडाने कोकण हादरले*; *कोयत्याने वार करून पत्नीची हत्या तर सहा वर्षाच्या चिमुकल्यालाही संपवले

0
487

 

कोंकण – कोकणात दुहेरी हत्याकांडाने लांजा तालुका हादरला आहे. पत्नी व सहा वर्षाचा चिमुकल्याची हत्या पतीनेच केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हा सगळा धक्कादायक प्रकार गुरुवारी 3 ऑगस्ट गुरुवारी रोजी साडेसहा दरम्यान समोर आला आहे. या हत्याकांडपकरणी संदेश रघुनाथ चांदिवडे (संशयित) रा. कोट पाष्टेवाडी, ता. लांजा या नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र तो सध्या फरार असून पोलिसांची तीन पथके त्याचा शोध घेत आहेत. स्वतःच्या पत्नीची हत्या कोयत्याने सपासप वार करून करण्यात आली आहे तर मुलाची हत्या गळा आवळून अथवा तोंड दाबून करण्यात आला आहे.

सोनाली संदेश चांदिवडे वय २६ वर्षे,प्रणव संदेश चांदिवडे वय ६ वर्षे या दोघांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेचे माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी लांजा यशवंत केडगे,लांजा पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी तात्काळ फरार आरोपीच्या शोधार्थ पोलिसांच्या तीन पथकांची नेमणूक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी आहे की
सौ. सोनाली संदेश चांदिवडे वय २६ वर्षे हि दि.१९ जुलै २०२३ रोजी लांजा डाफळेवाडी येथून तिचा पती संदेश चांदिवडे याला काही न सांगता कोठेतरी निघुन गेली होती. ती दि.२९ जुलै २०२३ रोजी ती सापडली,तेव्हापासून तिचे पती संदेश रघुनाथ चांदिवडे तसेच मुलांसह घरी कोट पाष्टेवाडी येथे राहत होती. दिनांक ०३ ऑगस्ट रोजी सकाळी ६.४५ वा.चे पूर्वी कोट पाष्टेवाडी ता. लांजा जि. रत्नागिरी येथे रहाते घरी संशयित संदेश रघुनाथ चांदिवडे याने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून आपली पत्नि सौ. सोनाली संदेश चांदिवडे वय २६ वर्षे हिच्या मानेवर कोणत्यातरी हत्याराने वार करुन हत्या केली. याचवेळी मुलगा कु. प्रणव संदेश चांदिवडे वय ६ वर्षे याचीही निर्घृणपणे हत्या करण्यात आली. चिमुकल्या प्रणवची हत्या गळा आवळून किंवा नाक तोंड दाबुन ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. फिर्यादी यांनी संदेश रघुनाथ चांदिवडे याचेविरुद्ध कायदेशिर फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून या दुहेरी हत्याकांड प्रकरणी संशयित आरोपी गुन्हा रजि दाखल करणेत आलेला आहे. सदर गुन्हयाचा जाहीर रिपोर्ट मा. हुजुर कोर्टात सादर केला. तसेच वरिष्ठांना बिनतारी संदेशान्वये कळविण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटकडे हे करीत आहेत.ह्या हत्याकांडामुळे अवघ्या कोकणात खळबळ झाली असुन संशयित फरार असलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आपल्या टीम रवाना केल्या आहेत.

दरम्यान ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. संशयित फरार आरोपी संदेश चांदिवडे हा वीजबिलांच्या मीटरचे रीडिंग घेण्याचे काम करत असे त्याने केलेल्या या निर्गुण हत्याकांडामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here