दरड कोसळलीच नाही, तो व्हिडीओ फेक, तहसीलदारांनी केलं स्पष्ट

0
116

सिंधुदुर्ग – कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथे दरड कोसळल्याचा असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याच्यामध्ये कोणतीही सत्यता नसल्याची माहिती कणकवली तहसीलदार आर जे पवार यांनी दिली आहे.

सध्या कणकवली मध्ये पाऊस सुरू आहे. याच अनुशंगाने बुधवारपासून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडीओ मध्ये फोंडाघाट येथे दरड कोसळण्याचे दाखविले जात असून घाट बंद असल्याचे सुचित केले आहे. मात्र हा व्हिडीओ फेक असून अशी कोणतीही दरड पडली नसल्याने प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या संबंधी फोंडाघाट सरपंच संतोष आंग्रे यांनीही घाटामध्ये अशी कोणतीही दरड कोसळेलेली नसल्याचे सांगत ती अफवा असल्याचे म्हटले आहे.

 

दरड कोसळलेला व्हिडीओ व्हायरल होत असल्याने सगळ्यांच्याच मनात हा घाट बंद असल्याची शंका कुशंका उपस्थित होत आहे. यासंबंधी कणकवली तहसीलदार आर जे पवार यांनीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेतलेल्या माहितीनुसार अशी कोणतीही दरड फोंडाघाट येथे कोसळलेली नाही. घाट ही बंद नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी या फेक व्हिडिओ विश्वास ठेवू नये, असे आवाहन कणकवली तहसीलदार श्री. पवार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here