तळवडेत फिरत्या विक्रेत्यांकडून पोलीस पाटलालाच शिवीगाळ ग्रामस्थ आक्रमक; संबंधितांना घेऊन सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव…

0
128

 

सिंधुदुर्ग : पोलीस पाटलाशी हुज्जत घालणाऱ्या कोल्हापुरातील फिरत्या विक्रेत्यांना आज तळवडे येथील ग्रामस्थांनी दणका दिला. पोलीस पाटलाने त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केली असता संबंधितांनी त्यांना शिवीगाळ केल्याची तक्रार घेऊन ग्रामस्थांनी पोलिस ठाणे गाठले. यावेळी प्रभारी पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी पोलिस ठाण्यात या प्रकाराची नोंद करून घेत “त्या” विक्रेत्यांना समज देऊन सोडून दिले.

तळवडे बाजार पेठेत आज सकाळपासून संबंधित विक्रेते स्क्रॅच कार्ड कुपन घेऊन फिरत होते. यावेळी पोलिस पाटलाने संबंधित विक्रेत्यांना तुम्ही पोलीस ठाण्यात माहिती दिली का ? अशी विचारणा केली. तसेच त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केली, यावेळी त्यांनी पोलीस पाटलाशी अर्वाच्च शब्दात वर्तणूक केली. दरम्यान या सर्व प्रकारानंतर त्या ठिकाणी जमलेल्या ग्रामस्थांनी पोलीस पाटलाशी हुज्जक्त घालणाऱ्या त्यातील एका विक्रेत्याला चोप दिला व थेट सावंतवाडी पोलिस ठाण्यात आणले. याबाबत पोलिस ठाण्यात या प्रकाराची नोंद करण्यात आली आहे.

यावेळी पंचायत समिती माजी सभापती पंकज पेडणेकर,जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, ग्रामपंचायत सदस्य मंगल पेडणेकर आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here