डॉन दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तेचा होणार लिलाव

0
238

सिंधुदुर्ग – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर याच्या खेड तालुक्यातील मालमत्तेचा १० नोव्हेंबर रोजी लिलाव होणार आहे. मात्र कोविडच्या संकटामुळे हा लिलाव प्रत्यक्ष जागेवर येऊन न करता मुंबई येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी खेड येथे येऊन लिलाव केल्या जाणाऱ्या मालमत्तेची पाहणी केली. जे बोलीधारक या लिलावात भाग घेणार आहेत, ते देखील या अधिकाऱ्यांसोबत उपस्थित असल्याची माहिती आहे.

एकूण सात मालमत्तांचा होणार लिलाव –
कुख्यात तस्कर दाऊद इब्राहिम कासकर याचे मूळ गाव हे खेड तालुक्यातील मुंबके आहे. या गावात त्याचा बंगला, आंब्याची बाग असून लोटे आणि खेड शहर अशा सात ठिकाणी त्याच्या वेगवेगळ्या मालमत्ता आहेत. केंद्र सरकारने या मालमत्ता ताब्यात घेऊन त्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार १० नोव्हेंबर रोजी या मालमत्तांचा लिलाव होणार आहे. मात्र कोविडच्या संकटामुळे हा लिलाव प्रत्यक्ष जागेवर येऊन न करता मुंबई येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे.

केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी खेड येथे येऊन लिलाव केल्या जाणाऱ्या मालमत्तेची पाहणी केली. जे बोलीधारक या लिलावात भाग घेणार आहेत, ते देखील या अधिकाऱ्यांसोबत उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे.

दाऊदच्या मालमत्तेच्या लिलावासाठी चांगला प्रतिसाद मिळत असून अनेकजण मालमत्ता घेण्यासाठी इच्छूक असल्याचे अधिकऱ्यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी ही मालमत्ता विक्री करण्यात आम्ही यशस्वी होऊ असा विश्वासही अधिकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर हा गुन्हेगारी विश्वाचा बादशाह म्हणून ओळखला जातो. भारतासाठी दाऊद मोस्ट वॉन्टेड आहे. 64 वर्षीय डॉन दाऊद इब्राहिम हा मुंबईवरील 1993 मधील साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टर माईंड आहे. दाऊदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषीत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here