डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप कळसुली प्रा. आरोग्य केंद्रातील तिसरी घटना संतप्त नागरिकांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना घातला घेराव

0
98

सिंधुदुर्ग – कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे आज अजून एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले. आज पहाटे सहाच्या सुमारास कळसुली परबवाडी येथील महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

 

कळसुली गावातील ही तिसरी घटना आहे. कळसुली प्रा. आरोग्य केंद्रात रात्री ड्युटीला असणारे डॉ. गणेश आयणार हे ड्युटीची वेळ संपण्याआधीच घरी गेल्यामुळे संबंधित महिलेवर वेळेत उपचार झाले नाहीत.

 

त्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे संतप्त होत ग्रामस्थांनी कणकवली तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पोळ यांना घेराव घातला.

 

कळसुली गावात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना जीव गमवावा लागल्याची ही तिसरी घटना आहे.

 

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे लोकांचा जीव जात असेल, तर वैद्यकीय सेवेचा आणि वैद्यकीय पेशाचा उपयोग काय, असे म्हणत नागरिक संतप्त झाले.

 

या संतप्त नागरिकांनी कणकवली तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पोळ यांना घेराव घालत धारेवर धरले.

 

यावेळी सरपंच साक्षी परब, तंटामुक्ती अध्यक्ष चंदू परब, रुपेश आमडोस्कर, सुशांत दळवी, मधुकर चव्हाण, रुजाय फर्नांडिस, मोहन दळवी, विजय परब, नंदू परब, गुणाजी परब, सत्यवान परब, नंदकिशोर सुद्रीक तसेच कळसुली गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here