ठाकरेचे उमेदवार हाताच्या पंज्यावर निवडणूक लढविणार;आमदार नितेश राणे यांचा गौप्यस्फोट

0
91

 

सिंधुदुर्ग : काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षणा देशातील सनातन हिंदू धर्म संपवायचा आहे. आणि त्यासाठीच प्रंतप्रधान मोदींजींना टार्गेट केले जात आहे.मात्र यांनी कितीही प्रयत्न केला तरी ते यात यशस्वी होणार नाहीत. मात्र काँग्रेस ने उबाठा सेना संपविण्याचा घाट घातला आहे.काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांना मोजायला तयार नाही.त्यांनी तर उबाठा पक्ष काँग्रेस मध्ये विलीन करावा असा प्रस्ताव दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ४८ जागा काँग्रेस पक्ष स्वबळावर लढण्याचा सर्व्हे करतआहे.त्यामुळे उद्धव ठाकरेचे उमेदवार हाताच्या पंज्यावर निवडणूक लढविणार आहेत. असा गौप्यस्फोट भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केला.
अदाणी समूहाबाबत काल सुप्रीम कोर्टाने अतिशय महत्वाचा निकाल दिला. त्यांच्या उद्योगामुळे आपला देश प्रगती पथावर आहे.असे असताना विरोधक हिंडनबर्ग रीपोर्टचा नावाखाली देशाची बदनामी करत होते तो प्रकार सन्माननीय सुप्रीम कोर्टांने हाणून पडला आहे.त्यामुळे मिर्ची झोंबल्याने आणि 10 जनपथ ची चाटु गीरी करण्यासाठी आज संजय राजाराम राऊत ने गरळ ओकली आहे. सिल्वर ओक वर बसणारे महागुरू शरद पवार हे अदानींना का भेटतात.हे प्रथम संजय राऊत ने जाणून घ्यावे.गुरू अदाणीचे कौतुक करतात याचा अर्थ तुला फाट्यावर मारतात तुझी लायकी काढतात.तुझी आणि तुझ्या मालकाची लायकी काय आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे भूकण्यासाठी राऊत ला बिस्कीट दिल जातंय तेव्हढेच त्यांनी खावे आणि अदानी वर बोलण्यापूर्वी सिल्वर ओक मध्ये अदाणीबाबत काय मत आहे हे विचारून बोलावे असा सल्ला आमदार नितेश राणे यांनी दिला.
सातत्याने हा संजय राजाराम राऊत माननीय कोर्टाचा अपमान करत आहे. सुप्रीम कोर्ट असेल किंवा हायकोर्ट त्यांनी दिलेल्या निर्णयावर चुकीच्या पद्धतीने टीका करून कोर्टाची बदनामी करत आहे. त्यामुळे राऊत वर सुमोटो कोर्टाने कारवाई करावी आणि अटक करावी अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली.संजय राऊत आणि अर्बन नक्षली यांचा काय सबंध आहे याचा तपास झाला पाहिजे.
आमदार जितेंद्र आव्हाड धमकी प्रकरणी बोलताना आमदार नितेश राणे म्हणले,प्रभू श्री राम यांचा अपमान केल्यानंतर तो कुठलाही हिंदू सहन करणार नाही. आव्हाड पाकिस्तान मध्ये राहत नाही. भारतात राहतात हा तर ट्रेलर आहे अजून पिक्चर बाकी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here