28 C
Panjim
Friday, December 2, 2022

ट्रक आणि अल्टो 100 फूट खोल दरीत कोसळले

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

सिंधुदुर्ग – फोंडाघाटात ट्रक आणि अल्टो कार 100 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले मात्र सुदैवाने जीवितहानी टळली आहे. दाजीपूर खिंडीपासून फोंडयाच्या दिशेने सुमारे 3 किमी अंतरावर 8 एप्रिल रोजी दुपारी 11 वाजून 45 मिनिटांनी हा अपघात घडला. रंजित बाळासो भांडवले ( वय 31, रा. भडगाव, ता कागल, जि कोल्हापूर ) हे अल्टो कार क्र. ( MH 06 AN 7787 ) मधून प्रवास करत होते. तर ट्रकचालक मोहम्मद बापूसो मुजावर ( वय 55, रा.कागल, जि.कोल्हापूर ) हे आपल्या ताब्यातील ट्रक क्र. ( MH 41 G 5355 ) चालवत होते. नेमका अपघात कसा झाला हे समजले नसले तरी दोन्ही वाहने 100 फूट खोल दरीत कोसळली. अपघात स्थळी अल्टो कार ही ट्रकखाली चिरडल्याचे दिसत होते. मात्र अल्टो चालक रंजित भांडवले यांनी सीटबेल्ट लावलेला असल्यामुळे ते बालंबाल बचावले. भांडवले हे किरकोळ जखमी आहेत. तर ट्रकचालक मोहम्मद मुजावर आणि ट्रकमधील सहप्रवासी सुभाष शिवाजी देसाई, दत्तात्रय बाबुराव देसाई ( दोघे रा. मसवे, भुदरगड जि कोल्हापूर ) हे जखमी झाले आहेत. घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थांनी जात दरीत उतरून सर्व अपघातग्रस्त जखमींना सुखरूप दरीतून बाहेर काढले. घटनास्थळी कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, सागर मचाळ, हायवे वाहतूक पोलीस हवालदार दिलीप पाटील, हवालदार अण्णा घारकर दाखल झाले आहेत.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles