जिल्हा बँकेसाठी मतमोजणी सुरू ; उमेदवारांची वाढली धाकधूक

0
133

 

सिंधुदुर्ग – जिल्हा बँकेच्या निवडणूक मतमोजणीला सुरुवात झाली असून सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. अत्यंत चुरशीने झालेल्या जिल्हा बँक निवडणुकीत भाजपा आणि महाविकास आघाडी च्या पॅनेल मध्ये सत्तेसाठी प्रचारादरम्यान जोरदार रस्सीखेच झाली होती. 19 संचालक पदासाठी 968 मतदारांनी आपले मतदान केले असून थोड्या वेळात पहिला निकाल हाती येणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी सकाळी ९ वाजता मतमोजणी सुरू झाली आहे. सिंधुदुर्गनगरी येथील माध्यमिक शिक्षक पतपेढी येथे ही मतमोजणी होत आहे. प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वंदना खरमाळे यांच्या नियंत्रणाखाली ही मतमोजणी सुरू झाली असून एका फेरीत आठ टेबल लागणार आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक यावेळी राज्यात बहुचर्चित ठरली आहे. जिल्हा बँकेसाठी एकूण १९ संचालक निवडून द्यायचे आहेत. यासाठी ३९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ९८१ मतदार निश्चित झाले होते. ३० रोजी झालेल्या मतदानावेळी ९६८ मतदारांनी मतदान केले आहे. १३ मतदारांनी मतदान केले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना व अपक्ष मिळून महाविकास आघाडी समृद्धी विकास पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात आहेत. तर भाजप सिद्धिविनायक परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here