26.3 C
Panjim
Saturday, December 3, 2022

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारची पोलीस बळाद्वारे दडपशाही संतोष परब हल्ल्यात आ. नितेश राणेंना दडपशाही ने अटक केल्यास आम्ही गप्प बसणार नाही केंद्रीयमंत्री नारायण राणेंचा इशारा

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

सिंधुदुर्ग – जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला पोषक वातावरण असून जिल्हा बँकेत भाजपलाच विजयी कौल मिळणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते हतबल झाले असून सुडाचे राजकारण करून भाजपा कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींना त्रास देत अटकसत्र सुरू करत आहे. दडपशाहीने भाजपा कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींना अटक केल्यास गप्प बसणार नाही केंद्रात आमची सत्ता आहे हे लक्षात ठेवा असा इशारा केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत दिला.

 

यावेळी आम. रवींद्र चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जि.प.गटनेते रणजीत देसाई उपस्थित होते. कणकवलीतील संतोष परब हल्ल्यातील आरोपी पकडले गेलेत. तरीही या प्रकरणात आ.नितेश राणे आणि माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत यांना वारंवार पोलीस स्टेशनला बोलावून पोलीस चौकशी करून त्रास देत असून त्यांना अटक करण्याची शक्यता आहे.

 

महाविकास आघाडी चे सरकार हे सुडाचे आणि आकसाचे राजकारण करत आहे. सत्तेचा दुरुपयोग करून पोलीस बळाचा वापर करून दडपशाही केली जात आहे. मात्र सिंधुदुर्गवासीय शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस च्या दडपशाहीला जुमानणार नाहीत. पोलिसांनी राज्य सरकारचे ऐकून दडपशाही केल्यास केंद्रात आमची सत्ता आहे, आणि मी केंद्रात मंत्री आहे लक्षात ठेवा असा इशाराही केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

 

भाजपा कार्यकर्ते , लोकप्रतिनिधींना पोलीस बळाचा वापर करून त्रास देणे, दडपशाही करणे बंद न केल्यास भाजपा एसपी कार्यालयावर मोर्चा काढेल , जिल्ह्यात सूरु असलेल्या अवैध धंद्यांचा पर्दाफाश करू असा इशाराही राणे यांनी दिला.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles