चिवला समुद्रात बुडणाऱ्या पुण्यातील महिला पर्यटकास स्थानिकांनी वाचविले

0
30

सिंधुदुर्ग – चिवला बीच येथील समुद्रात बुडणाऱ्या पिंपरी-पुणे येथील एका ५७ वर्षीय महिला पर्यटकास स्थानिकांनी तरुणांनी वाचविल्याची घटना आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान घडली.

येथील पर्यटनासाठी पुण्याहून २० जणांचा ग्रुप चिवला बीच येथे आला होता. यात आज सकाळी हे सर्वजण चिवला समुद्रात समुद्रस्नानासाठी उतरले होते.

यात एक ५७ वर्षीय महिला पाण्याचा अंदाज न आल्याने बुडत असल्याचे स्थानिक पर्यटन व्यावसायिकांच्या निदर्शनास येताच फ्रान्सिस फर्नांडिस, सागर धुरी, स्वीटन सोज, कृष्णा सावंत यांनी घटनास्थळी धाव घेत त्या महिला पर्यटकाला सुखरूप किनाऱ्यावर आणले. तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here