चालकाचा ताबा सुटल्याने कार पुलावरून कोसळली पर्यटक जखमी; एडगांव येथील घटना…

0
94

 

सिंधुदुर्ग – चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार पुलावरून कोसळली आहे. एडगांव-वैभववाडी मार्गावरील पुलावर हा अपघात झाला आहे. या अपघातात चार पर्यटक जखमी झाले आहेत. तर कार चालक गंभीर जखमी झाला आहे. स्थानिक नागरिक व पोलिसांनी जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही.

मुंबई येथील पर्यटक कोल्हापूर मार्गे दोन कारने गोव्याकडे निघाले होते. एडगांव पुलानजीक कार आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार थेट नदीत कोसळली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबतचा अधिक तपास वैभववाडी पोलिस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here