गोवा हद्दी लगतच्या चेकपोस्ट वर सुरु आहे आरोग्य तपासणी

0
110

 

सिंधुदुर्ग – सावंतवाडी तालुक्यातील गोवा हद्दी लगत असलेल्या सातारा व आरोंदा चेक पोस्टवर आरोग्य तपासणी पथक तयार करून आरोग्य तपासणी केली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ही तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

शनिवारी जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, सावंतवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी रोहीणी सोळंके, सावंतवाडी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी सावंतवाडी पोलीस ठाणे हद्दीतील आरोंदा चेकपोस्टला एकत्रितपणे भेट देऊन पाहणी केली. यावेळी गोवा राज्यातून येणारे व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणारे कामगार याबाबत पोलीस अधीक्षक दाभाडे यांनी माहिती घेतली. या ठिकाणी गोवा राज्यातून येणारे व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणारे लोकांची आरोग्य तपासणी करणेबाबत पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यानी संबधीत विभागाशी संपर्क साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य तपासणी होणे गरजेचे असल्याचे सांगितले .त्यानुसार रविवारपासून सावंतवाडी पोलीस ठाणे हद्दीतील आरोंदा व सातार्डा या चेकपोस्ट वर गोवा राज्यातून येणारे व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणारे लोकांची आरोग्य तपासणी तसेच संशयितांची एन्टिजन टेस्ट चालू करण्यात आली आहे. यामुळे कोरोना चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होणार आहे असे पोलीस अधीक्षक दाभाडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here