गाडलाच ! आम. नितेश राणेंची सतीश सावंतांच्या पराभवावर बोचरी प्रतिक्रिया

0
155

 

सिंधुदुर्ग : जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेचे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या पराभवानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी ” गाडलाच ” अशी बोचरी प्रतिक्रिया देत सतीश सावंतांवरील आपला राग आणि त्यांच्या पराभवाचा आनंद व्यक्त केला आहे.

जिल्हा बँक निवडणुकीत भाजपाच्या हाती जिल्हा बँक आणण्यासाठी आम. नितेश राणे यांनी सुरवातीपासूनच व्यूहरचना आखली होती. मात्र ऐन मतदानाच्या आधी संतोष परब वर झालेल्या हल्ल्यात आ. नितेश राणेंचे नाव फिर्यादीत आल्यानंतर निवडणूक प्रचारापासून नितेश राणेंना लांब राहावे लागले . राणेंकडून दहशतवाद केला जात असल्याचा प्रचार संतोष परब हल्लाप्रकरणामुळे राणेविरोधकांकडून करण्यात आला.

महाविकास आघाडीकडून दहशतवाद हाच प्रचाराचा प्रमुख मुद्दा वापरला गेला. राणेंना जिल्हा बँकेत सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस ची आघाडी एकवटली होती.तर सतीश सावंत यांनी आ. नितेश राणेंना टार्गेट करत जिल्हा बाज निवडणुकीत राणेंवर वैयक्तिक टीकाही केली होती. संतोष परब हल्ला प्रकरणाच्या आड आ. नितेश राणेंना जिल्हा बँक निवडणूक प्रचारापासून दूर ठेवण्यात सतीश सावंत यांची खेळी यशस्वी ठरली होती.

मात्र विरोधकांच्या या सगळ्या खेळीना पुरून उरत भाजपा आणि राणेंनी जिल्हा बँकेवर भाजपाची निर्विवाद एकहाती सत्ता आणली. त्यात महाविकास आघाडीचे पॅनेलप्रमुख असलेल्या सतीश सावंत यांचाही पराभव भाजपाने केला. आणि सतीश सावंत यांचा पराभव होताच आ. नितेश राणे यांनी ट्विटरवर सतीश सावंत यांचा पराभूत झाल्यानंतर ” गाडलाच ” अशा अत्यंत बोचऱ्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. नितेश राणेंच्या या ट्विट चीच जिल्ह्यासह राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here