गडकिल्ल्यांचे संवर्धन ही शासनाचीच जबाबदारी आहे -मुख्यमंत्री उध्दव ठाकरे नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलारमामा संयुक्त समाधीच्या नुतनीकरणाचे लोकार्पण

0
196

 

नरवीर तानाजी मालुसरे यांच्यासारख्या प्रेरणादायी आत्मबलिदान देणाऱ्या शिवछत्रपतींच्या शिलेदाराच्या उमरठ परिसराचा विकास कर्तव्य म्हणून करणार. गडकिल्ल्यांचे संवर्धन ही शासनाची जबाबदारी आहे. केवळ इतिहासात रमण्यापेक्षा इतिहास घडविणे महत्त्वाचे आहे. पोलादपूर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांनी दिली.

सोमवार, दि.17 फेब्रुवारी 2020 रोजी पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथे महाराष्ट्र शासन, रायगड जिल्हा परिषद आणि नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने नरवीर तानाजी मालुसरे यांच्या 350 व्या पुण्यतिथीनिमित्त समाधी वास्तूच्या नुतनीकरणाचे लोकार्पण मुख्यमंत्री ना.ठाकरे यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. या सोहोळयास रायगडच्या पालकमंत्री ना.अदिती तटकरे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, आ.भरत गोगावले, आ.अनिकेत तटकरे, आ. महेंद्र दळवी, आ.महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, माजी राज्यमंत्री मिनाक्षीताई पाटील, राजिपच्या बांधकाम सभापती निलीमा पाटील, महिला बालकल्याण सभापती गीता जाधव, माजी आमदार मनोहर भोईर, माजी राजिप उपाध्यक्ष आस्वाद पाटील, नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत कळंबे, जलमित्र किशोर धारिया, भावनाताई पाटील, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या 12 व्या वंशजांच्या स्नुषा डॉ.शीतल मालुसरे आणि 13 वे वंशज रायबा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मोरेमाऊली संप्रदायाचे आध्यात्मिक गुरू आनंददादा मोरे माऊली यांची विशेष उपस्थिती लाभली.

याप्रसंगी मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांनी, आजचा दिवस तीर्थयात्रेचा असून यानंतर गणपतीपुळे, आंगणेवाडी येथे जाणार असून या दौऱ्याची सुरूवात नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाच्या दर्शनाने होत असल्याने पवित्र दिवस असल्याचे सांगितले. कोकणातील विशेषत महाड पोलादपूरसह रायगड जिल्ह्यातील मातीने केवळ तांदूळ, भाजापाली अशी पिके न देता नरवीरांचे शूर मर्दांचे पीक दिले आहे. छत्रपतींनी आपले रक्षण केलं हा इतिहास म्हणजे आपलं वैभव आहे. शिवनेरीची माती घेवून अयोध्येला गेलो. याला श्रध्दा किंवा अंधश्रध्दा काहीही समजा पण एका वर्षाच्या आत त्याचा निकाल लागला. रामजन्मभूमीमध्ये राममंदिर झालेच पाहिजे. शिवराजधानीची माती घेऊन गेलो तेव्हा तर चमत्कारच झाला आणि मुख्यमंत्री झालो. ही चमत्काराला जन्म देणारी आणि चमत्कार घडविणारी माती आहे, असे आवर्जून सांगितले.

छत्रपती शिवराय होऊन गेले 300वर्ष झाली 400वर्षे झाली, अशी हजारो वर्षे होऊ देत पण छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव कोणी विसरू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं नाव घेतलं की अंगामध्ये एक रोमांच उभा राहतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात मोठा चमत्कार केला म्हणजे तानाजींसारख्या असंख्य लोकांमध्ये त्यांच्या शक्तीचा संचार घडविला. आयुष्याची राखरांगोळी होईल माहीत असूनसुध्दा आयुष्य पणाला लावणारी तानाजींसारखी माणसे महाराजांनी तयार केली, असे सांगताना मुख्यमंत्री ना. ठाकरे यांनी हल्लीच्या काळात कोणाला पक्षात घेताना काय देणार हे सांगावे लागत आहे, असे सांगून महामंडळ, एमएलसी अशा पध्दतीची मागणी होत असते, असा टोलाही लगावला. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव म्हटले की स्फुरण चढते.पर्यटन विकासाचे धोरण हे शासन राबवित आहे. त्यामुळे पर्यटनदृष्टया विकास या परिसराचा होणारच. मात्र, इतिहासात रमण्यापेक्षा इतिहास घडविणे महत्त्वाचे आहे, आयुष्य कसं जगावं हे दाखवण्यासाठी या परिसरामध्ये तुम्ही जे जे मागाल ते मी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही, हे वचन मी तुम्हाला देतो, असे यावेळी मुख्यमंत्री ना.ठाकरे म्हणाले.

प्रारंभी प्रास्ताविकामध्ये सोहळयाचे स्वागताध्यक्ष तथा महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार भरत गोगावले यांनी, पोलादपूर तालुक्यातील पाणीटंचाईचा आवर्जून उल्लेख करीत येथे होणारा मुसळधार पाऊसदेखील उन्हाळयातील पाणीटंचाई दूर करू शकत नसल्याने पोलादपूर तालुक्यात असलेल्या पाच नद्यांवर पाच बंधारे होण्याची गरज असल्याचे सांगितले. पोलादपूर तालुक्यातील चंद्रगड, कांगोरीगड, मिनीमहाबळेश्वर कुडपण, महादेवाचा मुरा तसेच महाड तालुक्यातील शिवथरघळ तसेच अन्य उपेक्षित शिवसमर्थ कालीन ऐतिहासिक स्थळे, श्रीवर्धन येथील दक्षिणकाशी आदी स्थळांचा विकास करण्याची गरज असल्याचे सांगून पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथे हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 36 वर्षांपूर्वी भेट दिली असता या भुमिची माती मस्तकी लावल्याची आठवण आवर्जून सांगितली. नरवीर तानाजी मालुसरे यांचा अंत्यविधी झाला ज्या कोंढाणा किल्ल्यावर त्यांनी लढता लढता देह ठेवला तेथून तो देह मढेघाटामार्गे उमरठ येथे आणला गेला. हा रस्ता करून या रस्त्याला नरवीरांचे नांव दिल्यास आपल्या सरकारकडून एक मोठे काम होईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली. नरवीर तानाजी मालुसरे यांचे बंधू सूर्याजी मालुसरे यांची समाधी साखर येथे असून त्यासाठीही भरीव तरतूद करण्याची गरज असल्याचे सांगून 1980 साली माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी उमरठ येथे शौर्यदिन आणि स्मृतीदिन सोहळयाची सुरूवात केली होती. त्यापूर्वी नरवीरांचा पुतळा तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आला होता. यानंतर प्रथमच या भुमीने मुख्यमंत्री यांची उपस्थिती अनुभवली आहे, असे आवर्जून सांगितले. शिवराजधानी रायगडच्या पायथ्याशी 70 एकर जमिनीमध्ये शिवसृष्टी उभारण्याच्या प्रकल्पामध्ये राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचेही स्मृतीस्थळ व्हावे, ज्यामुळे पुढील पिढयांना त्यापासून प्रेरणा मिळावी, असे सांगितले.

रायगडच्या पालकमंत्री ना.अदिती तटकरे आपल्या भाषणात, आजचा सोहळा गौरवाची बाब आहे. पोलादपूर तालुका हा डोंगराळ तालुका आहे. मात्र तो दुर्गम म्हणून घोषित व्हावा. ज्यामुळे या तालुक्याच्या सर्वांगिण विकासाची कामे सुरू करता येतील. सध्या उमरठ परिसराला क वर्ग पर्यटन दर्जा प्राप्त आहे. तो ब वर्ग करून अनेक सोयी सुविधा करण्याचा मानस असून आदित्य ठाकरे हे पर्यटन खात्याचे मंत्री असून आपण त्याच खात्याच्या राज्यमंत्री आहोत असे सांगून दोघांच्या नावांच्या उच्चारांमध्ये साम्य असून विचारांमध्येही साम्य असल्याने चांगली पर्यटन विकासाची कामे दिसून येतील, असा विश्वास व्यक्त केला. उमरठ याठिकाणी वाढत्या संख्येने येणारे पर्यटक लक्षात घेता, याठिकाणी लवकरच महिला बचतभवन उभे केले जाईल. त्यात प्रशिक्षण आणि विक्रीची सुविधा असेल. पोलादपूर तालुक्यासाठी 5 कोटी रुपये खर्चातून पोलादपूर तालुका क्रीडा संकूल उभे करण्यासाठी जमीन ताब्यात घेतली जात असून पोलादपूर तालुक्यासाठी सुसज्ज प्रशासकीय इमारत उभारण्याचा मानस असल्याचे सांगितले.

याप्रसंगी शिवव्याख्याते नितीन बामुगडे पाटील यांनी त्यांच्या ओजस्वी वाणीने तानाजींच्या हिंदवी स्वराज्यातील निवडीचा आणि स्वामीनिष्ठेचा प्रसंग ओघवत्या भाषणात सांगून वातावरणात शिवशक्तीचा संचार घडविला. यावेळी त्यांनी, शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी करणाऱ्या श्वापदांना मारून त्यांची शेपटी दाखविणाऱ्या मावळयास सोन्याचे कडे बक्षिसी देण्याची दवंडी पिटवली आणि यानिमित्ताने श्वापदांचा बंदोबस्त झालाच पण हिंदवी स्वराज्यासाठी कणखर जिगरबाज मावळयांची मेळवणीही झाली. तानाजी मालुसरे यांनी जनावर मारून जिजाऊंच्या भेटीला गेल्यानंतर सोन्याच्या कडयाची बक्षिसी कोणाला हवी, आऊसाहेबांची पाठीवर कौतीकाची थाप पडावी म्हणून अधीर झाल्याचे सांगितल्याचे तसेच रायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन शिवछत्रपतींकडे गेल्यानंतर कोंढाणा परत स्वराज्यात आणण्यासाठीची आऊसाहेबांची इच्छा असल्याचे शिवछत्रपतींनी सांगितल्यानंतर आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं म्हणून गर्जना करणाऱ्या तानाजींच्या स्वामीनिष्ठेचे प्रसंग उदधृत केले.

 

मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांच्या हस्ते कृषि विभागाच्या शेतकरी योजनेच्या चित्रफितीचे अनावरण करण्यात आले. शेवटी नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी आभार मानले. नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलारमामा समाधी नुतनीकरणाचा लोकार्पण सोहळा संपल्यानंतर यंदाचा नरज्ञाीर तानाजी मालुसरे 2020 पुरस्कार या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना देण्यात माजी राज्यमंत्री ना.मिनाक्षीताई पाटील यांच्याहस्ते देण्यात आला. सोहळयाच्या सांगतेवेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आ.प्रवीण दरेकर हे समारंभस्थळी उपस्थित राहिले असता त्यांचे स्वागत राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी केले.

सकाळी नरज्ञाीर तानाजी मालूसरे आणि शेलारमामा यांच्या संयुक्त समाधीला केशज्ञा हरी कळंबे आणि संजय महाराज कुलकर्णी यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आल तर उत्सज्ञा समिती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत कळंबे आणि ज्ञिाठ्ठल कळंबे यांच्याहस्ते पूजाज्ञिाधी होऊन ज्ञानोबा मालुसरे यांच्या हस्ते ज्ञिाणापुजन करण्यात आले. याज्ञोळी नरज्ञाीरांच्या समाधीला महादेज्ञा महाराज कळंबे तर शेलारमामा यांच्या समाधीला नामदेज्ञा कळंबे यांच्याहस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. याज्ञोळी ध्ज्ञाजारोहण कृष्णा कळंबे यांच्याहस्ते झाले. सकाळी रायगडच्या पालकमंत्री ना. अदिती तटकरे यांच्याहस्ते नरज्ञाीर तानाजी मालुसरे यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करण्यात आल्यानंतर तेथून समाधीस्थळापर्यंत नरज्ञाीर तानाजी मालुसरे यांच्या पालखीची भज्ञय मिरज्ञाणूक ढोल झांज लेझीम पथक ऐतिहासिक चित्ररथ शालेय ज्ञिाद्यार्थी आणि स्ज्ञायंसेज्ञाी संस्थांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सहभागासह उत्साहात काढण्यात आली. याप्रसंगी देशातील विविध भागात राहणारे मालुसरे वंशज मोठया संख्येने उपस्थित होते तसेच कुडपण येथील शेलारमामांचे वंशजही आवर्जून उपस्थित राहिले. यावेळी अनेक शिवकालीन शस्त्रविद्येची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. पोलादपूर तालुका कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी कैलास धुमाळ आणि कर्मचारी वर्गाने यावेळी कृषी प्रदर्शन आणि कृषी अवजारांचे प्रदर्शन करणारे स्टॉल उभारून तालुक्यातील जनतेचे प्रबोधन करण्यासोबतच पर्यटकांनादेखील आकर्षित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here