खिशाला फटका ! सिंधुदुर्ग – मुंबई विमान प्रवासभाड्यात 4 पट वाढ

0
66

सिंधुदुर्ग – उडाण योजनेनंतर्गत चिपी विमानतळाचा समावेश केल्यामुळे सिंधुदुर्ग ते मुंबई हा विमान प्रवास फक्त अडीच हजारांत करता येणार ही सुखद भावना सिंधुदुर्गवासीयांना होती.

 

मात्र विमानतळ सुरू झाल्यामुळे कोकणात विमानाने जाण्याचे स्वप्न पूर्ण झाले असतानाचं विमानाच्या तिकीट दर वाढल्याने आता विमान प्रवास महागला आहे महिन्याभरातच मुंबई ते सिंधुदुर्ग विमानतळ तिकिटाचे दर 12 हजार रुपये झाला आहे.

 

सिंधुदुर्गातून मुंबई आणि मुंबईतून आपल्या गावी सिंधुदुर्गात येण्यासाठी चाकरमानी तसेच स्थानिक प्रवाशांना अडीच हजार रुपये तिकीट दर हा काही अंशी परवडणारा होता.

 

मात्र दिवाळी सण संपताच सिंधुदुर्ग मुंबई विमान प्रवास भाड्याने मोठे उड्डाण केले असून अडीच हजार रुपयाला मिळणारी विमान तिकीट आता चक्क 12 हजार रुपयाला मिळत आहेत.

 

तब्बल चौपट वाढलेल्या विमान तिकीट दरामुळे सिंधुदुर्ग मुंबई प्रवास चिपी पेक्षा गोव्यातून मुंबईपर्यंत विमानाने केलेला बरा अशीच नाराजीची भावना प्रवाशांमध्ये व्यक्त होऊ लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here