खारेपाटण चेक पोस्ट ला जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिली भेट

0
104

सिंधुदुर्ग – कोकणात विशेषकरून सिंधुदुर्गात यंदा गणेश चतुर्थीच्या सणाला मुंबईवरून येणाऱ्या गणेश भक्त चाकरमान्यांची वाढती संख्या लक्षात घेता तसेच कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी आज दुपारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरील खारेपाटण चेक पोस्ट येथे कार्यरत असलेल्या आरोग्य, महसूल आणि पोलीस प्रशासन यांच्या पथकाला तातडीची भेट देऊन पाहणी केली.

यावेळी कणकवली पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन कटेकर उपस्थित होते. पोलीस अधीक्षक दाभाडे यांनी खारेपाटण चेक पोस्ट येथील आरोग्य व महसूल पथकातील कर्मचारी वर्गाशी संवाद साधला व काही मार्गदर्शक सूचना कर्मचारी वर्गाला केल्या.

तसेच मुंबईवरून येणाऱ्या चाकरमानी वर्गाच्या वाहनांच्या विविध पार्किंगच्या ठिकानांची पाहणी करून गर्दी वाढणार नाही याची चोख दक्षता घेण्याच्या सूचना देखील त्यांनी येथे कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचारी आरोग्य व महसूल कर्मचारी यांना केल्या.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणाऱ्या गणेशभक्त प्रवाशासाठी खारेपाटण चेक पोस्ट येथे मोफत चहा व पाणी वाटप करणाऱ्या सुकांत वरूनकर यांचे अधीक्षक दाभाडे यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here