कोकण रेल्वे मार्गावर गाड्या उशिराने प्रवाशांची ऐन पावसातरखडपट्टी कायम

0
239

कोकण मार्गावर गुरूवारीही प्रवाशांच्या पदरी रखडपट्टीचा प्रवास कायम राहिला. ११ रेल्वेगाड्या विलंबाने धावल्याने प्रवाशांच्या मनस्तापात भर पडली. नागपूर-मडगाव स्पेशल तब्बल ६० तास, मंगला एक्स्प्रेस २ तास ४८ मिनिटे, तर करमाळी-एलटीटी वातानुकुलित सुपरफास्ट स्पेशलही ३ तास ५१ मिनिटे उशिरानेच मार्गस्थ झाली. रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होण्यामागचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. मात्र कोकण मार्गावर सलग २ दिवस झालेल्या मेगाब्लॉकमुळे वेळापत्रकावर परिणाम झाल्याचे समजते.

गुरूवारी ०११३९ क्रमांकाची नागपूर-मडगाव स्पेशल तब्बल ६ तास १९ मिनिटे विलंबानेच

धावल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. ०९०५७ क्रमांकाची उधना-मंगळूर स्पेशल २ तास ३६ मिनिटे तर १०१०३ क्रमांकाची सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस १ तास ५५ मिनिटे उशिराने रवाना झाली. १०१०५ क्रमांकाची दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस १ तास ३१ मिनिटे तर १०१०६ क्रमांकाची सावंतवाडी-दिवा पॅसेंजर १ तास ३० मिनिटे उशिराने मार्गस्थ झाली. १२०५२ क्रमांकाची मडगाव- सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेसही ५७ मिनिटे विलंबानेच धावली.

१२६१८ क्रमांकाची निजामुद्दीन-
एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस २ तास ४८ मिनिटे तर २६२० क्रमांकाची मत्स्यगंधा एक्सप्रेस १ तास उशिराने धावली. या पाठोपाठ २२११४ क्रमांकाची कोच्युवेली-एलटीटी स्पेशल १ तास तर २२११६ क्रमांकाची करमाळी-एलटीटी वातानुकूलित स्पेशल ३ तास ५१ मिनिटे विलंबाने धावल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. २२११९ क्रमांकाची सीएसएमटी-मडगाव तेजस एक्सप्रेस ४५ मिनिटे, तर २२९०८ क्रमांकाची हापा-मडगाव एक्स्प्रेसही १ तास ९ मिनिटे उशिराने रवाना झाली. बिघडलेल्या वेळापत्रकाचा प्रवाशांना फटका बसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here