कोकणी रानमाणुसाचा’ राज्य शासनाकडून सन्मान! सिंधुदुर्गातील शाश्वत पर्यटन क्षेत्रात केलेल्या कामगिरीची घेतली दखल

0
152

 

सिंधुदुर्ग – राष्ट्रीय पर्यटन दिवसाच्या निमित्ताने मलबार हिल मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावचा सुपुत्र प्रसाद गावडे अर्थात ‘कोंकणी रानमाणूसाचा’ सिंधुदुर्गातील शाश्वत पर्यटन क्षेत्रात केलेल्या कामगिरी बद्दल राज्य शासनाच्या पर्यटन मंत्रालयाकडून गौरव करण्यात आला. प्रसाद हा व्यवसायाने इंजिनिअर असून चांगलं करियर सोडून तो पर्यटन तसेच कोकणचा निसर्ग वाचवा यासाठी धडपडत असतो. पर्यटन व्यवसायासोबत व्हिडीओ व्लॉग मार्फत अनेक शाश्वत विकासांचे पर्याय, कोकणातील पर्यटन व्यवसायीकांना प्रसिद्धी आणि कोकणाची खाद्य संस्कृती, जीवन शैली याची माहिती देत लाखो लोकांपर्यंत तो पोहचलाय.

येत्या काळात राज्याच्या पर्यटन विभागा सोबत “ग्रामीण आणि समुदाय आधारित पर्यटन”(Rural and community based tourism) अंतर्गत काम करणार आहे. तसेच पर्यटन विभागाच्या क्रिएट युवर ओन स्टोरीच्या माध्यमांतून रान माणूसच्या एक्सप्लोरेशनचा नवीन व्हर्च्युअल प्रवासही राज्यातील लोकांसाठी घडविणार असल्याची माहिती प्रसाद याने दिली आहे. यावेळी पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह यांच्यासह एमटीडीसीचेअन्य अधिकारी आणि पर्यटनातील भागधारक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here