कोकणात पावसाचा जोर वाढला ,सावंतवाडीत अनेक रस्ते पाण्याखाली, पर्यटक सुखरूप पोहोचले पण गाड्या रस्त्यात अडकल्या राजापुरात जवाहर चौकात पुराचे पाणी; खेड,चिपळूण अलर्ट मोडवर

0
216

कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात व तळ कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल आहे तर अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. तर जिल्हाअंतर्गत अनेक रस्त्यांवरती पाणी असल्याने मार्ग बंद झाले आहेत. सिंधुदुर्ग कोल्हापूर मार्गावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. कोकणात पावसाचा जोर रविवारी संध्याकाळी वाढला आहे. तर राजाभरात जवाहर चौकात पाणी आलं आहे खेड चिपळूण अलर्ट मोडवर आहे शनिवारी मध्यरात्री खेड येथे पुराचा धोका निर्माण झाला होता, त्यामुळे मध्यरात्री भोंगा वाजून नागरिकांना सतर्क करण्यात आल होतं. सिंधुदुर्ग कोल्हापूर रस्त्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील मांडूकली गावात रस्त्यावर पाणी आल्याने कोल्हापूर गगनबावडा हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे.कोल्हापूर ला जाण्यासाठी फोंडा घाट मार्गे पर्यायी रस्ता उपलब्ध आहे. दोडामार्ग जवळ कुडासे वानोशी येथे घराची भिंत उघडून एक वृद्ध महिला जखमी झाली .सुदैवाने दोन मुले आणि सून बचावली आहेत,त्यांच्यासह त्यांची सून व दोन लहान नातवंडे घरात होती.मात्र प्रसंगावधान राखून त्यांच्यासह त्यांची सून मुलांना घेऊन बाहेरच्या दिशेने पळाल्याने तिघेही सुखरूप राहिली.भगवान वरक यांचे कुडासे वानोशी येथे राहते घर आहे.अतिवृष्टी मुले घराची भिंत कोसळून वरक यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी पंचनामा करण्यात आला आहे. कुटुंबं स्थलांतरीत झाले असून घरातील धान्य भिजले आहे. दरम्यान रेवस रेड्डी या सागरी महामार्गावरही काही ठिकाणी दगड व दरड कोसळल्याने हा मार्गही वाहतुकीसाठी बंद आहे त्यामुळे एसटी प्रवासी विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.

सावंतवाडी तालुक्यात गेळे गावात येण्यासाठी मुख्य रस्त्यावरील हिरण्यांकेशी नदी वरील पूल मागील 5/6 दिवस पाण्याखाली आहे
चौकुळ येथील भारती भागू लांबर यांच्या 2 शेळ्या नदीत वाहून गेल्या. तसेच बमु बाबू लांबर यांची 1 गाय वाहून गेल्याने या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बांदा ते दानोली जाणारे रस्त्यावर तेरेखोल नदीतील पाणी आले असल्याने रस्ता वाहतूकीस बंद आहे.सातोळी ते बांदा जाणारे रस्त्यावर पाणी आल्याने जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी या रस्त्यावरती पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

*तिलारी नदीमध्ये धरणाचे पाणी*

तिलारी मुख्य धरणाचा दि. 22.07.2023 पासून सांडवा प्रवाहीत झाला आहे. आज दि. 23.07 2023 रोजी रोजी सकाळी 8.00 वा सांडवा पाणी पातळी 106.70 मी इतकी असून तिलारी नदीमध्ये 165.814 घन मीटर प्रति सेंकद इतक्या वेगाने सांडव्यातून विसर्ग सुरु आहे. तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणारे पर्जन्यमान पाहता सांडव्यातील विसर्गात वाढ होऊन तिलारी नदीची पाणी पातळी वाढु शकते. जिल्हा व तालुका प्रशासन आणी जिल्हा आपत्ति व्यवस्थापन कक्ष यांच्याशी सांडव्यावरील विसर्ग, नदी पातळी, धरण पाणी पातळी याबाबत सकाळी व सांयकाळी माहिती अद्यावत करुन संपर्कात राहुन योग्य ती कार्यवाही करणेत येत आहे. तरी नदी काठच्या ग्रामस्थांनी तसेच शेतक-यांनी नदीपात्रात उतरु नये व योग्य ती सावधनता व खबरदारी बाळगावी अस आवाहन प्रशासनाकडून करण्यात आल आहे.

वेंगुर्ले तालुक्यात तुळस पलतड येथील त्या धोकादायक दरडी च्या ठिकाणी असलेल्या ४ घरातील ११ ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. म्हापण येथे ही दरड कोसळल्याने दोन घरातील सहा जणांना सुरक्षित स्थळी हलविले आहे अशी माहिती तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दिली

 

कोकणात रत्‍नागिरी जिल्ह्यात खेड येथेही शनिवारी मध्यरात्री पुराचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे खेड व चिपळूण प्रशासन अलर्ट मोडवर असून खेड प्रांताधिकारी राजश्री मोरे,चिपळूण प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी योग्य सूचना प्रशासनाला दिल्या असून पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे हे ऑन फिल्ड आहेत. राजापुरात पुरपरिस्थिती धोका कायम असून पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे राजापूरला पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. तालुक्यात पडझडीच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी वीजही गायब आहे
राजापुरात येथील अर्जुना आणि कोदवली नद्यांची पातळी गेली पाच दिवस ईशारा पातळीच्या वरच आहे. या एकूणच अतृष्टी आणि पुरपरिस्थितीच्या पार्श्वभूमिवर प्रशासन मात्र अर्लट असून प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार सौ. शीतल जाधव, पोलीस निरीक्षक भरत धुमाळ राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले हे सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी आवश्यक साहित्याची आवराआवर आधीच केली आहे. जवाहर चौकात रविवारी सुद्धा पाणी असल्याने जवाहर चौकातील एसटी वाहतुक बंद होती. तर राजापूर शिळ, गोठणेदोनिवडे चिखलगाव रस्ता सलग पाचव्या दिवशीही पाण्याखाली असल्याने वाहतुक बंद आहे.

तसेच नदीकिनारी असलेले व्यापारी व नागरिकांना सर्तकतेच्या सुचना दिल्या. यावेळी या अधिकाऱ्यांनी नागरिक व व्यापाऱ्यांशी थेट संवाद साधून जर पुराचा धोका वाढला तर स्थलांतर करावे लागेल त्यासाठी तयारी ठेवा असे सांगितले.

 

धोपेश्वर आपदग्रस्त भागातील 98 ग्रामस्थांचे स्थलांतर- सौ. शीतल जाधव

राजापूर शहरानजीकच्या धोपेश्वर खंडेवाडी, गुरवाडी व नाडणकरवाडी भाग हा अत्यंत धोकादायक व दरड प्रवण क्षेत्रात येत असून या भागातील 30 कुटुंबातील 98 ग्रामस्थांनी तातडीने स्थलांतरीत व्हावे अशा नोटीसा प्रशासनाने बजावल्या होत्या मात्र गेले काही दिवस पावसाचा वाढलेला जोर व अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन तहसीलदार शीतल जाधव यांनी स्थानिकांशी चर्चा करून स्थलांतराची विनंती केली. या सर्व ग्रामस्थांनी स्थलांतराची तयारी दर्शवीली. यातील 50 जणांना राजापूर शहरातील श्री मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आहे तर उर्वरित आपल्या नातेवाईकांकडे गेले आहेत. या सर्वांची रहाण्याची व भोजन व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती तहसीलदार शीतल जाधव यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here