कोकणातील “कात ” व्यवसायिकांची खारेपाटण येथे बैठक सम्पन्न “रत्नदुर्ग ” कात उत्पादक संघटनेची स्थापना

0
93

 

सिंधुदुर्ग : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कात उत्पादक व्यवसायिकांची एक महत्वाची बैठक जेष्ठ कात व्यापारी बाळाशेठ तथा नारायण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली खारेपाटण येथील हॉटेल एन एच -६६ येथे सम्पन्न झाली.

कात उत्पादन हे ग्रामोद्योग प्रकारात येत असून शासनाने याला “वुडबेस इंडस्ट्री” स्वरूप दिले आहे. ग्रामीण भागातील अकुशल कामगार हे त्या ठिकाणी काम करत असतात. यामुळे त्यांना देखील रोजगाराचे सिजनेबल काम मिळू शकते.

तळकोकणात मोठ्या प्रमाणात खाजगी जमिनीत “खैर” हा वृक्ष होतो. त्याला तोडण्यासाठी व वाहतुकीसाठी जी प्रशासकीय कार्यपद्धती राबविली जाते. तीच पूर्णत: चुकीची आहे.

त्यामध्ये सुटसुटीतपणाचा भाव आहे आणि म्हणूनच खैरांच्या झाडांची अवैध तोड होत आहे. हे जाणून बुजून अमानवी चेहरा असलेल्या कायद्यामुळेच घडतात, असा आरोप कात व्यवसायिकाच्या बैठकीत करण्यात आला.

या व्यवसायाशी संबंधित वनविभागाचे काही कायदे शासनाने बनविताना कात व्यवसायीकांना विश्वासात घेऊन अभ्यासपूर्ण भौगोलिक परिस्थितीचा विचार करून बनविले पाहिजेत, अशी मागणी या सभेत करण्यात आली.

कात व्यवसायिक संघटनेची स्थापना कोकणातील कात व्यसायिकाच्या अन्यायकारक व जाचक अटीच्या विरोधात लढण्यासाठी “रत्नदुर्ग” कात उत्पादक संघटनेची स्थापना या बैठकीत सर्वानुमते करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here