कुणकेश्वर यात्रा नियोजनाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

0
176

 

सिंधुदुर्ग – दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळख असणाऱ्या देवगड तालुक्यातील कुणकेश्वर यात्रा नियोजन बैठक जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली. भाविकांना सर्व सुविधा देण्याचे आदेश मंजुलक्ष्मी यांनी अधिकाऱ्यांना दिले. देवदर्शनासाठी एकावेळी ५० व्यक्तींना परवानगी दिली जाईल. हॉटेल्स आणि भाविकांना सेवा देणारी, धार्मिक दुकाने मांडता येतील. तसेच व्यापाऱ्यांना कोविड लसीकरण बंधनकारक केले आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जि. प. सीईओ प्रजीत नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, परीक्षाविधीन उपजिल्हाधिकारी संजीत मोहपात्रा, तहसीलदार मारुती कांबळे, पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे, सरपंच चंद्रकांत घाडी, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लब्दे, उपाध्यक्ष दिनेश धुवाळी, सचिव शरद वाळके, खजिनदार अभय पेडणेकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here