किरीट सोमय्यांचे ब्लॅकमेलिंग, राणेंच्या ED चौकशीचं पुढं काय झालं याच उत्तर द्या? आमदार वैभव नाईक यांचे आव्हान

0
91

सिंधुदुर्ग – मुंबई महानगर पालिकेची निवडणूक जवळ आल्याने परिवहन मंत्री अनिल परब यांना गुंतवण्यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे ब्लॅकमेलिंग करत आहेत.

यापूर्वी खासदार नारायण राणे यांच्यावर केलेल्या ईडीचे चौकशीचे काय झाले?

असा सवाल शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी विचारला आहे.

किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपावर नाईक म्हणाले, शिवसेना पक्ष आणि नेत्यांवर तोंडसुख घेण्यासाठी किरीट सोमय्या पुढे आले आहे.

अनिल परब हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. वडिलोपार्जित घर दुरुस्ती त्यांनी केली असून सिंधुदुर्गात त्यांची या व्यतिरिक्त एकही मालमत्ता नाही.

मुंबई महानगरपालिकेमध्ये अनिल परब यांची ताकत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना गुंतवण्यासाठी अनिल परब यांच्यावर बेछूट आरोप करण्याचा प्रकार सोमय्या यांच्याकडून होत आहे. असेही आमदार नाईक म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here