कांदोळी भागात परप्रांतीयांनी हडपल्या गोवेकरांच्या जमिनी

0
498

कलंगुट मतदारसंघातल्या कांदोळी भागात स्थानिक वृद्ध महिलेच्या खासगी जमिनीमध्ये, बेकायदेशीरपणे परप्रांतीयांनी म्हणजेच जे समुद्र किनारी बांगड्या, तसेच पर्यटकांना घोळका करून मसाज करतात त्यांनी मोठं मोठी घरं बांधली आहे. रेव्होलुशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब यांनी काल कलंगुट मतदारसंघातील दौऱ्या दरम्यान त्यांनी इथे भेट दिली असता त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली आहे.

काही वर्षांपूर्वी हे परप्रांतीय, गोवेकारांच्या घरा घरात जावून प्लास्टिक, लोखंड गोळा करायचे, परंतु आज हेच परप्रांतीय गोव्यात बेकायदेशीर धंधे, चोऱ्या गुन्हेगारी करून मोठे पैसेवाले झालेले आहेत. आणि आज ते गोवेकरांच्या जमिनी बिंदास्तपणे, मोठ्या हिंमतीने हडप करून तिथे आपली घरं उभारतात. या सर्वाँना स्थानिक पंच सरपंच त्याच बरोबर स्थानिक आमदार मायकल लोबो असून, त्यांच्याच आशीर्वादाने हे त्यांना धाडस आल्याचे मनोज परब म्हणाले.

यावेळी मनोज परब यांनी परप्रांतीयांनी कशी बनावट कागदपत्र लावून गोवेकरांच्या जमिनी हडपल्या ते ही दाखवून दिले. एकीकडे तर गोवेकर कुटुंबाच्या सदस्यांची नावे लावून त्यांनी परप्रांतीयाला २००५ साली विकले असल्याचे दाखविण्यात आले. परंतु चौकशी दरम्यान ते कुटुंबाचे सदस्य २००५ सालच्या कित्येक वर्षे आधी मरण पावले असल्याचे समोराले. आज ही बनावट कागदपत्र कशी होतात. सरकार काय करतो. प्रशासनाचे लक्ष कुठे आहे. आज बनावट कागदपत्र करून गोवेकरांच्या जमिनी सर्रासपणे हडपल्या जातात, आणि राज्य सरकार कोणतीच कार्यवाही करत नाही. कित्येक खेपा मारूनही आज ह्या वृद्ध गोवेकर महिलेला जीची जागा परप्रांतीयांनी हडपली आहे, तिला न्याय मिळत नाही. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट असल्याचे मनोज परब म्हणाले.

राज्यातील हा डबल इंजिन सरकार गोवेकराना न्याय देण्यात अपयशी ठरला आहे. हा बीजेपी सरकार फक्त वोट बँक बनविण्यात, त्यांना बेकायदा बस्ती बनवून देण्यात मग्न असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे.

गोवेकरानी आतातरी हे समजून घेतलं पाहिजे की, बीजेपी- काँग्रेस हे फक्त परप्रांतीयांच्या भल्यासाठी काम करतात, त्यांना भूमिपुत्र करून आपली सत्ता कायम राखून ठेवण्यासाठी ते प्रयत्न करीत असून, गोवेकरांच अस्तित्व राखण्यात त्यांना काहीच रस नसल्याचे परब म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here