23 C
Panjim
Friday, January 28, 2022

काँग्रेस-राष्ट्रवादीची आज बैठक; निर्णयाच्या प्रतीक्षेत महाराष्ट्र   

Latest Hub Encounter

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आज दिल्लीत बैठक पार पडणार आहे. तर दुसरीकडे शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या आमदारांची भेट घेणार आहेत. यावेळी सरकार स्थापन करण्यात का उशीर होत आहे, याबाबत ते त्यांना माहिती देणार आहेत. तसंच या बैठकीत शिवसेनेची पुढील रणनितीदेखील ठरणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. नव्या आघाडीचं नाव काय असेल? तसंच तीन पक्ष एकत्र आले तर येत्या मुंबई महानगरपालिकेत निवडणुकांची स्थिती कशी असेल, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. २०२२ मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडणार आहे. दरम्यान आजच्या बैठकीच्या निमित्ताने अवघा महाराष्ट्र निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते नव्या आघाडीच्या महाशिवआघाडी या नावावर अनुकुल नसल्याची माहिती समोर आली आहे. आम्हाला नव्या आघाडीमध्ये कोणत्याही पक्षाचं नाव नकोय. एनडीए आणि युपीएमध्येदेखील कोणत्याही पक्षाचं नाव नाही, असं एका नेत्यानं बोलताना सांगितलं. यापूर्वी ही बैठक मंगळवारी पार पडणार होती. परंतु माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्यानं ही बैठक पुढे ढकलण्यात आली. आज पार पडणाऱ्या या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, के.सी.वेणुगोपाल आणि राज्यातील काही नेते मंडळी सहभागी होण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल, सुनिल तटकरे, अजित पवार, जयंत पाटील सहभागी होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -