कळणे मायनिंगचे खाणकाम व खनिज वाहतूक तात्काळ थांबविण्याचे आदेश, मे. मिनरल्स अँड मेटल्सला जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे आदेश

0
39

सिंधुदुर्ग – दोडामार्ग तालुक्यातील कळणे येथील खाणपट्ट्यामध्ये 29 जुलै रोजी झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियन 2005 नुसार जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी खाणपट्ट्यातील खाणकाम व खनिजाची वाहतूक पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत तात्काळ बंद करण्याचे आदेश मे.मिनरल्स ॲँड मेटल्स या सोमवारी दिले आहेत.

मे मिनरल्स ॲँड मेटल्स करिता संचालक संदीप श्रीवास्तव व व्यवस्थापक माईन्स मॅनेजर, कळणे माईन यांना पाठविलेल्या या आदेशात म्हटले आहे, 29 जुलै रोजी कळणे येथील प्रमुख खनिज खाण पट्ट्यातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर होऊन 20 ते 25 कुटुंबांच्या घरामध्ये पाणी गेले. तसेच शेतीचे व बागायतीचे नुकसान झाले आहे. मंजूर असलेल्या खाणपट्ट्याच्या उत्तरेकडील बाजूस असलेल्या डोंगराचा काही भाग व बेंचेस पाणी भरलेल्या खड्ड्यामध्ये पडले. त्यामुळे खड्ड्यातील पाणी मोठ्या प्रमाणावर बाहेर फेकले गेले. या खड्ड्यास असलेला बांध फुटून पाणी दुसऱ्या खडड्यामध्ये आले. पाण्याच्या अतिरिक्त दबावामुळे खाणीच्या दक्षिणेकडील बांध फुटला व त्यातील माती मिश्रीत पाणी मोठ्या प्रमाणात गावाच्या दिशेने प्रवाहित झाले. हे पाणी गावातील स्थानिकांच्या घरामध्ये, शेतामध्ये व बागायतींमध्ये शिरून नुकसान झाले आहे. खाणकाम व खनिजाची वाहतूक पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत तात्काळ बंद करावे असे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here