करुळ घाट आज सायंकाळी ६ वाजल्यापासून वाहतुकीसाठी खुला

0
75

सिंधुदुर्ग – करुळ घाटातील मोरीचा कठडा घसरल्याने तेथील रस्ता खचला होता. परिणामी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने व बांधकाम विभागाने १३ जुलै ते २६ जुलै करुळ घाट वाहतुकीसाठी पुर्णतः बंद केला होता.

त्यामुळे भुईबावडा घाटमार्गे पर्यायी वाहतूक सुरू होती. परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे भुईबावडा घाटातील रस्त्याला देखील मधोमध मोठ्या भेगा पडल्या आहेत.

याठिकाणीभुस्खलन होण्याची दाट शक्यता असल्याने भुईबावडा घाट पुढील सहा महिने वाहतुकीसाठी बंद केल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

त्यामुळे सध्या दोन्ही घाट मार्ग वाहतूकीसाठी बंद असल्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होताना दिसत होती. अखेर आज सायंकाळी सहा पासून करुळ घाट वाहतुकीसाठी खुला झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here