कणकवली शाखेसमोर पुन्हा वाढवला पोलीस बंदोबस्त

0
103

 

सिंधुदुर्ग – संतोष परब हल्लाप्रकरणी आरोपी असलेले आ. नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर लागलीच कणकवली नरडवे नाका येथील शिवसेना शाखेसमोर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दोन पोलीस अधिकाऱ्यांसह , राज्य राखीव दल तुकडी, दंगल नियंत्रण पथक तुकडी व अन्य पोलिसांचा बंदोबस्त शिवसेना शाखेसमोर तैनात आहे. हायकोर्टात नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर शिवसेना शाखेसमोर फटाके फोडण्यात आले होते. आज सुप्रीम कोर्टाने नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने दक्षता घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here