कणकवलीत शिवसेना भाजपा कार्यकर्ते आमने-सामने काही काळ तणावाचे झाले वातावरण; शिवसेनेच्या एलईडी स्क्रीन मुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक

0
70

 

सिंधुदुर्ग – कणकवलीत पुन्हा एकदा भाजपा शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आलेत. आज भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या आमदार नितेश राणे यांच्या सोबत दाखल झाले. कालपासूनच जिल्ह्यात सोमय्या दाखल होणार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याबद्दल बोलणार अशा बातम्या माध्यमातून येत असतानाच शिवसेनेने सोमय्या यांच्या नारायण राणे यांच्या विरोधात आलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ क्लिप थेट प्रोजेक्टर वर दाखवायला सुरवात केली. यामुळे वातावरण तापले आहे.

कणकवलीत तणाव पोलीस बंदोबस्त वाढवला

कणकवलीत शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोरच भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते गोळा झाले होते. त्यावेळी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने “किरीट सोमय्या तुम्ही बोलला त्याचा काय झालं? आज सांगाल का? सिंधुदुर्ग आपली वाट बघतोय” या मथल्या खालील एलईडी स्क्रीन लावून त्या स्क्रीनवर नारायण राणे यांच्या बद्दल किरीट सोमय्या यांनी केलेल्या त्यावेळच्या आरोपांबद्दल आठवण करून देणारी स्क्रिन याठिकाणी लावल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. या पार्श्वभूमीवर भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले असून, सोमय्या यांचे स्वागत करत असताना शिवसेनेने अशा प्रकारे केलेला हा स्टंटसाठी परवानगी घेतली आहे का? तसे असेल तर दहा मिनिटे वाट पाहू अन्यथा आम्ही या ठिकाणी एलईडी स्क्रीन किंवा डीजे लावू असा इशारा भाजपा कार्यकर्त्यांनी दिला.

दंगल नियंत्रण पथक तैनात

त्यामुळे कणकवली शिवसेना शाखेसमोर भाजपा व शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने आले असून, त्या ठिकाणी वातावरण तणावपूर्ण बनले आहे. दंगल नियंत्रण पथक सह पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था सज्ज केली आहे. मात्र काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते सध्या किरीट सोमय्या यांचे कणकवलीत आगमन झाले असून ते कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात यांची पत्रकार परिषद कणकवली येथील प्रहार भवन येथे होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here