कणकवलीत मतदान केंद्रावर सतीश सावंत व संजना सावंत यांच्यात बाचाबाची

0
131

 

सिंधुदुर्ग – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. कणकवली मतदानकेंद्रात मतदार आल्यानंतर मतदारांशी सर्वजण संवाद साधत आहेत. उमेदवार सतीश सावंत केंद्र परिसरात थांबले होते, तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत देखील या मतदान केंद्र परिसरात होत्या.समोरासमोर आल्याने दोघांमध्येही जोरदार बाचाबाची झाली,असून पोलिसांनी हस्तक्षेप करत हा वाद मिटवला आहे. मात्र या प्रकाराची जोरदार चर्चा रंगली आहे.

कणकवलीत अत्यंत शांतपणे मतदान सुरू होते मात्र मतदान केंद्रांमध्ये मोबाइल आणायचे नाही असे ठरले असताना, सतीश सावंत यांच्या हातात मोबाईल पाहिल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी त्याला आक्षेप घेतला. यावरून दोघांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली.

कणकवली पोलिसांनी तात्काळ या बाचाबाचीत हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्रातून बाहेर जायला सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here