28.2 C
Panjim
Tuesday, May 17, 2022

कणकवलीत गॅरेजला आग लागून नुकसान

spot_img
spot_img
spot_img

Latest On Hub Encounter

Latest on Passay

सिंधुदुर्ग – कणकवली शहरात गांगो मंदिर समोरील मोटरसायकलच्या गॅरेज मध्ये शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत पिंट्या चव्हाण यांच्या गॅरेजमधील साहित्याचे मोठे नुकसान झाले. आग सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास लागली.

सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास या गॅरेज लगतच्या दुकानदारांना गॅरेज मधील आतील भागातून धूर येत असल्याची बाब निदर्शनास येताच तातडीने या गॅरेजच्या शटरचे कुलूप तोडून दुकानदार व स्थानिकांनी ही आग आटोक्यात आणली.

मात्र तोपर्यंत गॅरेजमधील काही साहित्य जळून खाक झाले. त्यात एका मोटरसायकल करिता आणलेल्या नवीन साहित्याचा देखील समावेश आहे. आगीची माहिती मिळताच येथील स्थानिक नागरिकांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. काल स्टेट बँकेमध्ये शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना घडली होती.

त्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी कणकवलीत पुन्हा शॉर्टसर्किटने आग लागण्याचा प्रकार घडला. या आगीची माहिती मिळताच नाभिक संघटनेचे अध्यक्ष अनिल अणावकर यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
spot_img
- Advertisement -spot_img