सिंधुदुर्ग – कणकवलीतील कोरोना रुग्नांची संख्या वाढतच जात आहे. आता नव्याने सहा रूगन सापडले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय पोळ यांनी दिली. कणकवली फौजदार वाडी १, विद्यानगर ३, जानवली २ अशा ६ रुग्णांचा समावेश आहे. कणकवलीत हि वाढणारी रुग्नांची संख्या चिंतेचा विषय बनत आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी कंटेन्टमेंट झोन करण्यात आले असून त्यामुळे लोकांच्या दैनंदिन कामकाजावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. शहरात सध्या असलेल्या झोनमुळे येथील व्यापारावर परिणाम होताना दिसत आहे. दरम्यान कणकवलीत वाढणारे हे संकट आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्न करत आहे. जिल्ह्यात नव्याने १९ रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकुण रुग्ण संख्या १०९६ झाली आहे. कोरोनामुक्त ५९५, सक्रीय रूग्ण ४८२, कोरोनाने १९ जणांचा बळी घेतला.