26.6 C
Panjim
Tuesday, January 18, 2022

कणकवलीतील उड्डाणपुलाच्या धोकादायक भिंतीची प्रांताधिकाऱ्यांनी केली पाहणी तातडीने दुरुस्ती करण्याचे दिले आदेश

Latest Hub Encounter

 

सिंधुदुर्ग – कणकवली शहरातुन जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या सुरवातीचा बॉक्सलची भिंत गांगोमंदिर आणि एस.एम.हस्कुल समोरील कोसळण्याच्या शक्यता आहे.फूट दोन फूट पेक्षा जास्त ही भिंत मुख्य पिलर सोडून बाहेर आल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी भिंतीची पहाणी केली व दुरुस्ती करण्याचे आदेश दिले.

कणकवलीत महामार्गला उड्डाण पूल आहे त्यासाठीदुतर्फा सर्व्हिस रोड केला मात्र त्याच उड्डाणपुलाची बॉक्सवेची भिंत पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काळ सकाळी ही घटना लक्षात येताच सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले त्या भिंतीच्या लागतने होणारी वाहतून रोखण्यात आली.त्यानंतर कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार यांनी संपूर्ण उड्डाणपुलाची पाहणी केली. हायवे कनिष्ठ अभियंता गणेश महाजन, मुकेश साळुंखे, दिलीप बिल्डकॉनचे परिहार यांच्यासह कणकवलीवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठिकठिकाणी उड्डाणपुलाची भिंत मुख्य बांधकाम सोडून बाहेर आल्याने ती पडणार हे नक्की असल्याने अशी दृघटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा संतप सवाल आम्ही कणकवलीकर यांनी केला. उड्डाणपुलाच्या स्लॅबला तडे जाऊन आतील मातीच्या भरावात पावसाचे पाणी गेले आणि मातीचा लोड भिंतीवर आला आहे त्यामुळे चिखल भिंत फुटून बाहेर पडणार हे प्रांतांच्या पाहणी दरम्यान स्पष्ट झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -