एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट

0
148

 

जळगावात एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भातली सभा घेण्यासाठी ते आले आहेत. माझ्या नाराजीबाबत कोणतीही चर्चा त्यांच्यासोबत झाली नाही असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे. एकनाथ खडसे यांनी १२ डिसेंबरला गोपीनाथगडावर आपल्या मनात असलेली खदखद बोलून दाखवली होती. त्याच सभेत माझा काही भरवसा नाही मी कधीही पक्ष सोडू शकतो असंही खडसे म्हटले होते. एवढी सगळी नाराजी समोर आलेली असताना खडसे आणि फडणवीस भेट महत्त्वाची मानली जाते आहे. गिरीश महाजन यांनीही भाजपात सारंकाही आलबेल असल्याचं म्हटलं आहे.

“जिल्हा परिषदेच्या उमेदवारांसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. या विषयापलिकडे कोणताही विषय चर्चेला नव्हता. चंद्रकांत पाटील यांच्याकडे आम्ही नावं पाठवली होती. या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करा असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं. त्यानुसार आमची चर्चा झाली. इतर कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही. ” असं खडसे यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान या भेटीबाबत गिरीश महाजन यांना विचारलं असता, ” भाजपात सारं काही आलबेल आहे” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here