एकच निर्धार महायुतीचा खासदार असणार: नितेश राणे

0
127

 

सिंधुदुर्ग : आमदार अपात्रेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी तसेच शिवसेनेने महायुतीचे प्रत्येक जिल्ह्यात मेळावे घ्यायला सुरुवात केली आहे.कॉग्रेस आणि ठाकरे गटाला लोकसभा मतदारसंघात रोखण्यासाठी रणनीती मोठी आखली जात आहे.येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १४ तारखेला कणकवलीत महायुतीचा मेळावा घेतला जाणार आहे.आज कणकवली येथे महायुतीच्च्या पदाधिकाऱ्यांकडून संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मेळाव्या संदर्भात ही माहिती देण्यात आली.१४ तारखेच्या मेळव्याला भाजप कडून केंद्रीयमंत्री नारायण राणे,प्रसाद लाड, नितेश राणे,निलेश राणे तर शिवसेनेकडून शिक्षणमंत्री दीपक केसरकर व अन्य नेते उपस्थित राहणार आहेत.राष्ट्रवादी पक्षाकडून अजून कोणाचे नाव फिक्स झाले नसले तरी त्यांचे ही नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती महायुती मेळाव्याचे संयोजक नितेश राणे यांनी दिली.

आमदार नितेश राणे म्हणाले ;आमच्याकडे उमेदवारांची बाहुगर्दी आहे.ही चांगली गोष्ट नाही का?त्यामुळे महायुतीचा विजय निश्चित आहे.आमच्याकडे उमेदवारांची यादी आहे.तिकडे विनायक राऊत नावाचा आऊटेड माल आहे.चायनीज मॉडेल आहे.आमच्याकडे ओरिजिनल उमेदवारांची रांग लागलेली आहे.त्यामुळे ईच्छा व्यक्त करणे चुकीचं नाही.पक्ष श्रेष्ठी महायुतीबाबत योग्य निर्णय घेतील.आमचा एकच निर्धार आहे. महायुतीचाचं खासदार असणार.महायुतीच्या मित्र पक्षाचा खासदार असला पाहिजे.आणि दहा वर्ष विनायक विनायक राऊत नावाचा कलंक काळा ढबा सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाला लागलेला आहे तो आम्हाला महायुतीच्या ताकतीने 24 ला आम्हाला पुसून काढायचा आहे असा निर्धार महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. हा खासदार मोदीजींच्या बरोबर पाठवायचा आहे.

सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदार संघामध्ये भाजपचे साडेसहा लाख मतं असल्याचा दावा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.तर मंत्री उदय सामंत यांनी साडे आठ लाख मतं असल्याचं दावा करत आहेत.नेत्यामधील राजकीय उद्धा नंतर महायुतील पक्ष एकत्रितपणे निर्णय घेतील.

आमदार वैभव नाईक म्हणाले की,ज्या नारायण राणेंना बाळासाहेबांनी गद्दारी केली म्हणून हाकलून दिलं. तुमच्यासोबत मांडीला मांडी लावून पत्रकार परिषदेला बसणं हा बाळासाहेबांचा अपमान आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये तुम्ही एकत्र जा, ज्या ज्या वेळी तुम्ही एकत्र राहाल लोक तुम्हाला कशा पद्धतीने बघतील. खरे तर तुमच्या शिवसेनेत फूट का पडली ? बाळासाहेबांचे विचार दाबण्यासाठी फूट पाडली आणि जर कुठ पडलेल्या शिवसेनेला तुम्ही एकत्र घेऊन जर जनतेसमोर जात असाल तर तुम्हाला जनता तुमची जागा दाखवेल.

लोकसभेमध्ये या कोकणातील शिवसेनेचे खासदार होते, चार आमदार होते. आज तुम्ही तिकडे गेलात तुम्हाला आमचं खुलं आव्हान आहे शिंदे शिवसेनेच्या तिकिटावर तुम्ही लढवून दाखवा. तुमची या मतदारसंघात ताकद नाही, हे निवडणुकीत सिद्ध होईल. भाजप तुम्हाला तुमची लायकी या निवडणुकीत तुम्हाला दाखवून देईल.चौकशा सुरू होत्या म्हणून राणे भाजपमध्ये गेले. आज शिंदे गट आणि भाजपचे अनेक आमदार गटाकडे येण्यासाठी इच्छुक आहेत. उद्धव ठाकरे यांनी जे फिरायला गेले आहेत त्यांना फिरू दे, ठाकरे शिवसेना जरी फोडली तरी राज्यातील जनता उध्दव ठाकरे यांच्यासोबत आहे, हे भाजप ओळखून आहे. आज तुमच्याकडे २०० पेक्षा अधिक आमदार आणि ४० खासदार पेक्षा अधिक आहेत, तरी पण तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करावी लागते याच्यातूनच ठाकरेंची लोकप्रियता दिसून येते.
नितेश राणे यांनी ठाकरे यांच्यावर टीका करणे सोडून द्यावे ठाकरे बाणा हा वेगळा आहे, येणाऱ्या निवडणुकीत भाजप आणि राणे यांना जनता योग्य ती जागा दाखवेल.

नारायण राणे आणि निलेश राणे यांना जनतेने आधीच पराभूत करून तिकीट काढून दिले आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा जनतेच्या दरबारात येता, त्यासाठी तुम्हाला वेगवेगळे पक्ष बदलावे लागतात हे मात्र सत्य आहे. लोकांची तिकीट काढण्यापेक्षा आज तुम्ही भाजप बरोबर आहात, आज तुम्ही भाजपबरोबर आहात. भाजप नसेल तर तुमची ताकद शून्य आहे. त्यामुळे तुम्ही पुन्हा जनतेसमोर गेलात तर तुम्हाला जनताच पराभूत करेल.
असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here