उद्धव ठाकरे हे नरेंद्र मोदी सोबत जाऊन युती करणार होते तर मी युती केली तर काय चुकीचं आहे;दीपक केसरकर

0
126

सिंधुदुर्ग : बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर दोन गट निर्माण झाले. एक ठाकरे गट आणि एक शिंदे गट अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली. हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रतील जनतेने उघड्या डोळ्याने पाहिलं आहे. शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप जोरदार केले जात आहेत. खासदार संजय राऊत शिंदे गटावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी संजय राऊत आणि ठाकरे गटावर गोप्यस्पोट केला आहे टीकास्त्र सोडलं आहे.

मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे संपूर्ण कोणातली जनता पाठिशी राहिली, बाळासाहेबांना प्रेम दिल ,विश्वास दिला,त्यांची पूजा केली.त्या कोकणावर एवढा अन्याय होत असताना सातत्याने उद्धव ठाकरे यांच्या भेटी घेतल्या. उद्धव ठाकरे यांच्या भेटी घेतल्यानंतर सुद्धा काही घडत नव्हतं.त्यावेळी हा शेवट इलाज होता. कुठेतरी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा विचार जिवंत ठेवायचा होता.

राष्ट्रवादी सोडण्याआधी मी स्वतः बीजेपीमध्ये येण्याची इच्छा होती, आणि तो प्रवेश देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित प्रवेश होणार होता.ते सोडून मी शिवसेनेमध्ये आलो. बीजेपी आणि शिवसेनेची युती एकत्र रहावी हीच माझी ईच्छा होती. मला शिवसेनेने मंत्रिपद दिले म्हणजे माझ्यावर फार उपकार केले असे नाही. एवढंच नाही तर उद्धव ठाकरे यांची भेट सुद्धा पंतप्रधानांची मीच करून दिली होती. उद्धव ठाकरे हे कबूल देखील केलं होतं की युतीची पुनर स्थापना करू तुम्हीच त्यांना फसवताय आणि आम्हालाचं तुम्ही नाव ठेवताय हे चुकीचं आहे आहे. तुम्ही जर भाजपबरोबर गेला असता आणि तुम्ही युती स्थापन केली असती तर ते योग्य ,तुम्ही कबूल करून नाही केलं.म्हणून आम्ही आमचा निर्णय घेतला.त्यामध्ये आमचं चूक काय.याच उत्तर त्यांनी दिल पाहिजे.

सुनील तटकरे यांनी सुद्धा सांगितलं होतं की उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये युतीची स्थापना करावी, हिंदुत्वाच्या आणि पंतप्रधानांच्या विचाराची जावो. त्याच्यामध्ये खोडा कोणी घातला. हे सुद्धा जनतेला माहीत आहे. संजय राऊत यांनी तिथून येऊन ही बातमी फोडली.ती शरद पवार आणि अजित पवार यांच्या पर्यत घेऊन गेले. हे जे आम्ही केलं ते पूर्वीच महाराष्ट्रामध्ये घडणार होत.फक्त एका माणसांमुळे घडू शकलं नाही. विशेष म्हणजे ही वस्तूची ती आदित्य ठाकरे यांनी समजून घेतली पाहिजे. आणि जे हे दुसऱ्यांना नाव ठेवतात ही नाव ठेवणं चुकीचं आहे. आदित्य ठाकरे हे तरुण आहेत. ते बोललेले होते ते सर्वांच्या मनाकडे लागलेलं आहे.कोणी मनुष्य पैशासाठी पक्ष सोडत नाही. त्यांच्यापुढे त्यांचं करिअर असतं अनेक वर्ष ते आमदार असतात त्यांना त्यांच्या जनतेची सेवा करायची असते. विचारांसाठी आणि जनतेसाठी अशा प्रकारचं बंड होऊ शकतं. 50- 50 आमदार आणि 12-12 खासदार एकाच पक्षातून निघून जाऊ शकत नाही.
ज्यावेळी आपण मुख्यमंत्री असतो त्यावेळी आपण पक्षप्रमुख नसतो. पक्षप्रमुख पक्ष आदेशावर चालू शकत. मुख्यमंत्र्यांना जनतेला भेटावच लागत. मुख्यमंत्री हा जनतेचा मुख्यमंत्री असला पाहिजे. आणि तसा मुख्यमंत्री देणे आवश्यक होत. बाळासाहेबांनी बाहेर राहून संपूर्ण राज्य चालवलं होत. उद्धव ठाकरे यांना सुद्धा हे शक्य होत. सिंधुदुर्गातल्या जनतेने मला उत्तर द्यावं की उद्धव ठाकरे हे नरेंद्र मोदी सोबत जाऊन युती करणार होते तर मी युती केली तर काय चुकीचं आहे. असा गोप्यस्पोट मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here