उद्धव ठाकरे भाजपकडे पायघड्या घालत आहेत,आदित्य आणि तेजस ची शपथ घ्यावी

0
122

सिंधुदुर्ग : विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाच्या विरोधात निकाल दिल्यानंतर खासदार संजय राऊत यांचा तिळपापड झालाय.संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जोरदार निशाणा साधलाय. त्यावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेतलाय.संजय राऊत म्हणजे महाराष्ट्राने खावून थुंकलेले पान आहे. त्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची लायकी नाही.जशी पवनपुत्र हनुमान यांनी रावणाची लंका जाळली तशीच तुझ्या मालकाची लंका देवेंद्र फडणवीस यांनी पवनपुत्र हनुमानच्या रुपात जावून जाळली आहे.हे लक्षात ठेवा.२०१९ ला महाराष्ट्र विरोधी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली ती भूमिका आणि ते पाप जाळून महायुतीच्या रूपाने महाराष्ट्र राज्यात रामराज्य आलेले आहे.विश्व पुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्रात आले आहेत. महत्वाची उद्घाटने,आणि विकासकामे होत आहेत.नाशिक येथे देवदर्शन घेणार आहे. त्यावर लायकी नसलेले संजय राऊत यांनी टीका करून स्वतःची लाल करून घेत आहे.या भांडुपच्या देवानंद संजय राऊत ने मोदी साहेब यांच्या दौऱ्याचा अभ्यास करावा.नंतर टीका करावी.

कोणत्याही राज्यात, जिल्हामध्ये मोदी साहेब जातात तेव्हा प्रमुख देवतांचे दर्शन घेणे हे आमच्या हिंदुत्ववादी विचारांचे पंतप्रधान म्हणून त्यांची पद्धत आहे.

उद्धव ठाकरे यांची उरली सुरली लंका जळते आहे.त्याला तूच जबाबदार आहेत.अशी टीका संजय राऊत याचेवर केली.आदित्य ठाकरे आमच्या पक्ष श्रेष्ठींना भेटण्यासाठी पायघड्या घालून आहेत.आणि इकडे टीका करत आहे. उद्धव ठाकरे यांनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे की, ते भाजपकडे पायघड्या घालत आहेत.उरली सुरली उबाठा वाचविण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे वाघच होते मात्र उद्धव ठाकरे हे मांजर झालेले आहेत अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here