इलेक्ट्रिक इजिंनिअरिंग झालेला युवक करतोय शेळी पालन व्यवसाय.. परदेशात 16 वर्षे केली नोकरी… महिण्याला निव्वळ 2 लाख रुपये मिळवतोय..

0
446

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील भिरवंडे हे गाव सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले गाव आहे.या गावातील निलेश सावंत शेळी पालन व्यवसाय सुरू केलाय.निलेश सावंत यांचं बालपण, शिक्षण मुंबईत झाले. ‘इलेक्ट्रिक इजिंनिअरिंग’चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर देशात 16 वर्षे नोकरी केली . युरोप, चीन, दुबई, आखाती व आफ्रिकी देशांत‘प्रोजेक्ट मॅनेजर’ म्हणून कार्यरत होते.

सावंत यांना आपल्या मूळ गावच्या वातावरणाची ओढ कायम होती.कोकणात फक्त मे महिन्यात आणि गणपतीला वर्षांनी यायचं . तेथेच शेतीपूरक व्यवसाय उभारावा असे त्यांना कायम वाटायचे .अखेर सावंत यांनी परदेशातील नोकरी सोडून ते गावी परतले.आणि त्यांनी गावी येऊन शेळीपालन व्यवसाय सुरू केला. प्रथम सावंत यांनी व्यवसायातील प्रक्षिक्षण, शेळीपालकांकडे भेटी व काही ठिकाणी प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्यावर भर दिला.पुणे, पंढरपूर, बारामती, सावंतवाडी आदी 25 हून अधिक ठिकाणी त्या निमित्ताने त्यांनी भेटी दिल्या. संगोपन व्यवस्थापनापासून ते विक्री व्यवस्थेपर्यंतचे बारकाईने माहिती घेतली.आणि 4 वर्षे यशस्वीपणे शेळीपालन व्यवसाय सुरू आहे.

कोकणात येऊन विविध व्यवसायाची सुरुवातीला माहिती घेतली.सर्व व्यवसायाची माहिती घेतल्या नंतर शेळी पालन व्यवसाय करायचा ठरवलं.कोकणात रायगड,सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बंदिस्त शेळी पालन फारसे कोण करत नाही.
सुरुवातीला देशी, उस्मानाबादी, सोजत, सिरोही, बीटल या जातींच्या शेळ्या आणल्या. पण काही शेळ्यांना येथील वातावरणाचा मोठा फटका बसला.आणि काही शेळया दगावल्या.त्यामुळे सावंत थोडेसे नाराज झाले.त्यामुळे त्यांच्यासमोर “आफ्रिकन बोअर” जातीचा शेळी पालनाचा पर्याय समोर आला.आणि सावंत यांनी शेळी पालन करायला सुरुवात केली .त्या बोअर शेळ्यांची किंमत 1 लाखा पासून 15 लाखा पर्यत आहे.

हा शेळी पालन फार्म 10 गुंठ्यामध्ये साकारण्यात आला आहे.मूळ फार्म हा 100 फूट ते 30 फूट मध्ये उभा केला आहे. सध्या सावंत यांच्याकडे “आफ्रिकन बोअर जवळपास 127 शेळ्या आहेत.पण मात्र शेळ्यांच्या विक्रीसाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला आहे. त्यातून सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी,त्याचप्रमाणे सातारा ,कराड, संभाजीनगर या जिल्ह्यातील ग्राहक आहेत.
ओडिशा, आसाम, चेन्नई बिहार या ठिकाणी सुद्धा आम्ही शेळ्या विकतो.50 हजारांपासून 5 लाख रुपयांपर्यंत विकतो,वर्षभरात बोकडाचे वजन 100 ते 120 किलो पर्यंत होतात.या शेळ्यांना खाद्य मका, खुराक,कोकणातला ओला चारा ,सुखा चारा,देतात.

त्याचप्रमाणे कोकणात नवीन शेळी पालन व्यवसायिक तयार करतोय.कोकणात शेळी पालनाचा वाव द्यावा हा सुद्धा हेतू आमचा आहे.आतापर्यंत रायगड, सिंधुदुर्ग ,रत्नागिरी, गोवा या भागामध्ये 23 शेळी पालक तयार केले आहेत.

सावंत हे महिन्याला 5 लाख पर्यत शेळ्या विकतात. शेळयाचा खाद्य खर्च, कामगावर पगार व इतर खर्च वगळून महिन्याला 1.50 ते 2 लाखाचा निव्वळ नफा होतो.त्यामुळे कोकणात तरुण युवकांनी अशा शेळी पालनाकडे वळायला काहीच हरकत नाही. असे मत सावंत यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here