आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, रोहित पवार, धिरज देशमुख १७ जानेवारीला अमृतवाहिनीत. मेधा महोत्सवात अवधुत गुप्ते घेणार सहा युवा आमदारांच्या मुलाखती.

0
110

 

युवा नेते राजवर्धन थोरात यांच्या संकल्पनेतून अमृतवाहिनीत होत असलेल्या मेधा सांस्कृतिक महोत्सवात शुक्रवार दि. १७ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११ वाजता संवाद तरुणाईशी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, आ. रोहित पवार, आ. धिरज देशमुख,  आ. ऋतुराज पाटील, आ. झिशान सिद्दकी या तरुण आमदारांच्या मुलाखती महाराष्ट्रातील आघाडीचा गायक व संगीतकार अवधूत गुप्ते घेणार असल्याची माहिती संस्थेच्या विश्‍वस्त सौ. शरयूताई देशमुख यांनी दिली आहे.
अमृतवाहिनीमधील भव्य क्रीडा संकुल व मेधा मैदानावर होत असलेल्या या युवा महोत्सवाचे जिल्ह्यातील व राज्यातील युवकांचे मोठे आकर्षण ठरले आहे. विद्यार्थ्यांसाठी मोठे सांस्कृतीक व्यासपीठ असलेल्या मेधा महोत्सवाचे उद्घाटन गुरुवार दिनांक १६ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११ वाजता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, एबीबी कंपनीचे अध्यक्ष गणेश कोठावदे, विश्‍वस्त सौ. शरयुताई देशमुख, युवा नेते राजवर्धन थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे. शुक्रवार दिनांक १७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता संवाद तरुणाईंशी या कार्यक्रमात महाराष्ट्राचे पर्यावरण व पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे, ना. आदिती तटकरे, आ. रोहित पवार, आ. धिरज देशमुख, आ. ऋतुराज पाटील, आ.झिशान सिद्दकी या सर्व आमदारांच्या मुलाखती आघाडीचा गायक व संगीतकार अवधूत गुप्ते घेणार आहेत. या कार्यक्रमातून तरुणांना प्रेरणादायी राजकीय वाटचाल व युवकांचे राजकारणातील महत्व याचा उलगडा होणार आहे.
मेधा-२०२० च्या जय्यत तयारीसाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ,  डॉ. एम. ए. व्यंकटेश, उपप्राचार्य प्रकल्प प्रमुख प्रा. जी. बी काळे, डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ. बाबा लोंढे, प्रा. मनोज शिरभाते, एस. टी. देशमुख, प्राचार्या सौ. जे. बी सेठ्ठी, प्राचार्या शीतल गायकवाड, प्रा. विलास शिंदे, प्रा. अशोक वाळे, राकेश रंजन तसेच अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन, बी फार्मसी, डी फार्मसी, एम.बी.ए, आय.टी.आय, मॉडेल स्कूल, अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल, युनिअर कॉलेज, शिक्षक , विद्यार्थी व स्वयंसेवक विशेष प्रयत्न करत आहेत.
संवाद तरुणाईशी या कार्यक्रमासाठी तालुक्यातील व जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक, नागरिकांनी व पालकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here