सिंधुदुर्ग – सावंतवाडी तालुक्यातील नेमळे येथील प्रसिद्ध आंबा व्यावसायिक गुरुप्रसाद नाईक आणि त्यांचे बंधू विश्वनाथ उर्फ भाई नाईक यांनी आपल्या गणपती बाप्पाला चक्क पिकलेल्या हापूस आंब्याचा नैवेद्य दाखवला आहे. एवढेच नाही तर हा नैवेद्य तुम्ही देखील आपल्या लाडक्या बाप्पाला दाखवू शकता. नाईक बंधूंकडे हे पिकलेले हापूस हवे तेवढे मिळतात. मात्र त्याचा डझनचा दर आहे ३ हजार रुपये.
खरं तर गणेश चतुर्थीला गणपती बाप्पासमोर नैवेद्य म्हणून केळी, मोसंबी, सफरचंद, डाळिंब, चिकू, पेरू अशी अशी घाटमाथ्यावरची फळे उपलब्ध असतात. अशावेळी फळांचा राजा हापूस गणपतीला उपलब्ध करून एक वेगळीच पर्वणी गुरुप्रसाद नाईक यांनी गणेश भक्तांना निर्माण करून दिली आहे. त्यांचा हा आंबा संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक,गोवा, आंध्र प्रदेश, केरळ, गोवा यासह भारतातल्या बऱ्याच ठिकाणी खास गणेश चतुर्थीला गणपतीचा नैवेद्य आणी गणपती समोर ठेवल जाणार फळ म्हणून जात आहे.
गेली अनेक वर्ष कोकणचा फळांचा राजा हापूस आंबा हा गणेश चतुर्थीला उपलब्ध करून देण्याची किमया केली आहे, ती नेमळे येथील गुरूप्रसाद नाईक यांनी. मे महिन्यात आंब्याचा सीजन संपल्यानंतर पावसाळ्यात कोणत्या प्रकारचा सिझन नसताना हा आंबा कोल्ड स्टोरेजमध्ये मे महिन्यात स्टोरेज करून गणेश चतुर्थीसाठी खास लोकांच्या मागणीसाठी व आग्रहाखातर हा आंबा उपलब्ध करून दिला जात आहे. सेंद्रिय पद्धतीने आंबा पिकवून तो आम्ही कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवतो आणि चतुर्थीत लोकांच्या मागणीनुसार विकतो असे यावेळी गुरूप्रसाद नाईक यांनी सांगितले. मी महिन्यानंतर ६ महिने हापूस कोणतीही चव न बदलता राहू शकतो असे नाईक यांचे मत आहे.
सावंतवाडी तालुक्यात नेमळे येथे गुरुप्रसाद नाईक व त्यांच्या बंधूंची सुमारे ३०० एकर आंब्याची बाग आहे. या बागेत ते सेंद्रिय पद्धतीचा आंबा पिकवतात. मे महिन्याच्या मध्ये ते चांगल्या पद्धतीचे सुमारे अडीच हजार ते ३ हजार डझन चांगले आंबे कोल्ड स्टोरेज मध्ये स्टोरेज करून ठेवतात . पिशवीमध्ये अतिशय सीताफिने बांधूनहे आंबे ठेवले जातात. गणेश चतुर्थीला त्यांचा हा आंबा जिल्ह्यासह बाहेरच्या मोठ्या व्यक्तींच्या गणपती समोर पाहायला मिळतो. याशिवाय बेंगलोर व सावंतवाडीतील राजघराण्याच्या गणपतीसमोर त्यांचे आंबे दिसतात. डझनाला १५०० पासून ३००० पर्यंत दर मिळत असल्याने चांगला फायदा होत असल्याचे गुरुप्रसाद नाईक सांगतात.
हा आंबा टिकवण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते. कोल्ड स्टोरेज साठी मोठ्या प्रमाणात लाईट बिल येत हे परवडणारे नसते. बऱ्याचवेळा लाईट गेल्यास जनरेटरचा वापर करावा लागतो. सरकारने यासाठी ७५ टक्के वीज बिलावर सीबसीडी दिल्यास आणि सुविधा उपलब्ध करून दिल्यास हा प्रयोग यशस्वी होईल असा दावा गुरुप्रसाद नाईक करत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोल्ड स्टोरेज आहे मात्र…
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामॅंगोचे मोठे कोल्ड स्टोरेज आहे. मात्र महामँगो बुडीत गेली आणि हे कोल्ड स्टोरेज सध्या बंद स्थितीत आहे. हे कोल्ड स्टोरेज उपलब्ध करून दिल्यास आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंबा स्टोअर करू शकतो असे नाईक बंधू सांगतात. शिवाय जिल्ह्यातील गणेश भक्तांना आपल्या बाप्पाला नैवेद्य म्हणून आपला लाडका हापूसही अगदी कमी खर्चात दाखवता येऊ शकतो. असे सांगतानाच कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर आणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुढाकार घेऊन हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी गुरूप्रसाद नाईक व त्यांचे बंधू विश्वनाथ नाईक यांनी केली आहे.
बाईट
गुरुप्रसाद नाईक, आंबा व्यावसायिक नेमळे सिंधुदुर्ग