आंबेनळी घाटात पुन्हा मोठी दरड कोसळली वाहतूक ठप्प, वाहनांच्या मोठ्या रांगा

0
188

 

रायगड जिल्ह्यात पोलादपूर जवळ काही मिनिटांपूर्वी पुन्हा मोठी दरड कोसळल्याने खळबळ उडाली आहे. आंबेनळी घाटाजवळ प्रताप गडा च्या पायथ्याजवळ पोलादपूर हद्दीत घाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळली आहे पोलादपूर प्रशासनाची टीम रवाना आताच रवाना झाली आहे. ज्या ठिकाणी दरड कोसळली आहे त्या ठिकाणी दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. घटनास्थळी सर्व शासकीय यंत्रणा साहित्यसह हजर आहे. या दरडी बाबत माहिती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मात्र या ठिकाणी छोटे मोठे दगड खाली येण्याचा प्रकार रात्री उशिरापर्यंत सुरूच आहेत
आंबेनळी घाटाबाबत तालुका व जिल्हा प्रशासन 28 जून रोजी बुधवारी चर्चा करून व पाहणी करून मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

दरम्यान महाड कडून पुण्याकडे जाणारा वरंद घाटातील वाहतुकी बाबतही मोठा निर्णय घेतला जाणार आहे. या घाटातील अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी अशी शिफारस जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या सगळ्या घडामोडींवर महाडचे महसूल उपविभागीय अधिकारी डॉ. बनापुरे हेही लक्ष ठेवून आहेत.

 

आंबेनळी घाटात ज्या ठिकाणी ही दरड कोसळली आहे त्या ठिकाणाजवळ पोलादपूर तालुका प्रशासनाची टीम काहीवेळापूर्वी घटनास्थळी पोचली आहे.अद्यापही काही दगड खाली येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अद्याप तरी या मोठया दरडीमुळे कोणते नुकसान झाले आहे किंवा कसे हे मात्र कळू शकलेले नाही. याची माहिती घेण्याचं काम चालू आहे. मात्र तूर्तास तरी कोणतेही नुकसान झालं नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अद्यापही काही दगड खाली येत असल्याने नेमका अंदाज प्रशासनालाही लावता आलेला नाही. दोन्हीकडची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली असून आंबेनळी घाटात दोन दिवसात दगड खाली येण्याचे प्रकार व दरड कोसळण्याचे प्रकार घडत आहेत.यामुळे या घाटातील वाहतुकीबाबत मोठा निर्णय घेतल्या जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. दरम्यान रायगड पोलिसांकडून प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. पोलादपूर कडुन महाबळेश्वर कडे जाणारा आंबेनळी घाटामध्ये कालिका माता पॉईंट जवळ दरड कोसळली असल्याने आंबेनळी घाट दोन्ही बाजूकडून वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे. प्रवाशांनी ताम्हाणी घाटातून जाणाऱ्या मर्गाचा अवलंब करावा अशी सूचना
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केली आहे. रायगड पोलिसांचे पथक, पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर आहेत. महाडचे पोलीस उपविभागीय अधिकारी शंकर काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता व पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे व कर्मचारी जेसीबी व अन्य साहित्य घेऊन घटनास्थळजवळ हजर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here