26.3 C
Panjim
Friday, January 28, 2022

अरुणा पाटबंधारे प्रकल्पाची निविदा क्र. 3 नव्याने राबविली जाणार, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आश्वासन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगली येथे घेतली मंत्री पाटील यांची भेट

Latest Hub Encounter

 

सिंधुदुर्ग – वैभववाडी येथील अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पाची निविदा क्रमांक 3 च्या प्रक्रियेत घोळ असून ही प्रक्रिया रद्द करून नव्याने घेण्यात यावी अशी मागणी करत राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची सांगली येथे भेट घेतली. यावेळी मंत्री जयंत पाटील यांनी या प्रक्रियेची चौकशी करून ही प्रक्रिया नव्याने राबविली जाणार असल्याचे सांगितले. यावेळी शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या या निविदेच्या तक्रारीसाठी जलसंपदा मंत्री म्हणून आपल्याला दिलेल्या पत्रावर आणि ही निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या पत्रावर वेगवेगळ्या सह्या मारल्या असून आमदार नाईक यांची भूमिकाही संशयास्पद असल्याचे जयंत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधव, कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, डॉ. अभिनंदन मालंडकर, कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, सुंदर पारकर, संकेत सावंत, देवेंद्र पिळणकर आदी उपस्थित होते.

वैभववाडी मध्ये अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाच्या कामात मुळातच अनियमितता झाली आहे. तसेच या प्रकल्पाच्या निविदा क्रमांक 3 च्या प्रक्रियेत सुद्धा घोळ झाला आहे. ही प्रक्रिया राबवताना आपापसात कामे मॅनेज करून ठराविक ठेकेदारांना वाटली गेली आहेत. तसेच या प्रक्रियेत स्थानिक अधिकारी व ठेकेदार यांची मिलीजुली भगत असून भाजपा प्रणित पदाधिकाऱ्यांनी ही कामे आपापसात वाटून घेतली आहेत. याकडे यावेळो या पदाधिकाऱ्यांनी मंत्री जयंत पाटील यांचे लश वेधले. तसेच या प्रक्रियेबाबत शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी आपल्याला तक्रारींचे जे पत्र दिले त्या पत्रातील सही आणि कार्यकारी अभियंता याना दिलेल्या पत्रातील सही वेगवेगळी असून. ज्या अधिकाऱ्यांबाबत आमदार नाईक तक्रार करतात त्याच अधिकाऱ्यांना ही प्रक्रिया राबवायला हरकत नाही असे पत्र देतात यावरून आमदार नाईक यांचीही भूमिका संशयास्पद वाटते. अधिकारी आणि आमदार नाईक यांच्यात अर्थपूर्ण तडजोड झाल्याने नाईक यांनी एका रात्रीत आपली भूमिका बदलली आहे याचीही आपण दखल घ्यावी असेही या पदाधिकारी यांनी मंत्री पाटील यांना सांगितले.

त्यामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे संशयाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे. आधीच या प्रकल्पाच्या कामातील अनियमिततेमुळे स्थानिक लोकांमधून मोठी नाराजी आहे. तर आता अधिकारी व ठराविक ठेकेदार यांच्या संगनमताने या प्रकल्पाची निविदा क्रमांक 3 राबवली गेली असून ती तात्काळ रद्द करावी आणि नव्याने राबविण्याचे आदेश संबधित अधिकाऱ्यांना द्यावेत अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली असून ही प्रक्रिया नव्याने राबविली जाईल असे पाटील यावेळी म्हणाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अरुणा पाटबंधारे प्रकल्पाच्या अधिकारी व ठेकेदार यांचे धाबे दणाणले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -