7 दिवसांनी सापडला ” त्या ” युवकाचा मृतदेह गाळेलमध्ये खचलेल्या डोंगरखाली अडकला होता दुर्दैवी युवक

0
90

 

सिंधुदुर्ग – गाळेल येथील भूस्खलनामुळे डोंगर खचून त्याखाली अडकलेल्या वेंगुर्लेतील “त्या” दुर्दैवी युवकाचा मृतदेह आज बाहेर काढण्यात यश आले आहे.

गेले सात दिवस ग्रामस्थ व प्रशासनाकडून त्या युवकाचा शोध सुरु होता. पाच जे. सी. बी. मशिनच्या सहाय्याने त्याचा शोध घेणं सुरु होतं, अशी माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली.

गीतेश गावडे रा. मठ (वय २८) असे त्याचे मृत युवकाचे नाव आहे. आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक असल्याच्या कारणावरून गोवा हद्दीतून प्रवेश न मिळाल्याने गीतेश गाळेल डिंगणे मार्गे आडमार्गाने गोवा येथे कामाला जात असताना अचानक दरड कोसळल्याने तो दरडीखाली अडकला होता.

हा दरड कोसळलेला भाग एवढा मोठा होता, की ती दरड हटवायला सहा दिवस लागले. शेवटी सहा दिवसांच्या शोधमोहिमेने या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.

एनडीआरएफ टीम, स्थानिक ग्रामस्थ व महसूल प्रशासन यांच्या माध्यमातून ही शोधमोहीम सुरू होती. दोन दिवसानंतर काहीच खबर न मिळाल्यास मदत कार्य थांबविण्याचा निर्णय प्रशासन घेत असतानाच जोपर्यंत संबंधित युवकाचा मृतदेह हाती लागत नाही तोपर्यंत मोहीम थांबवू नका अशा सूचना आमदार दीपक केसरकर यांनी दिल्या होत्या.

त्यानुसार आज तब्बल सातव्या दिवशी या शोध मोहिमेला यश आले आहे. आज त्या युवकाचा मृतदेह दुचाकीसह आढळून आला.

मात्र ज्या ठिकाणी तो अडकल्याची शक्यता होती. त्या ठिकाणी तो आढळून आला नाही, असे तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here