सिंधुर्गात परतीच्या पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान सतत पडत असलेल्या पावसामुळे भात पिकांना कोंब.. सरकारने तात्काळ स्पॉट पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी

0
201

 

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घटस्थापनेनंतर परतीचा पावसाचा जोर वाढला आहे विजांच्या गडगडासह मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडताना पाहायला.सध्या कोकणात भात कापणीचा हंगाम सुरू आहे. आणि त्याच अचानक पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भात शेतीच नुकसान झालं आहे.तर काही ठिकाणी भात कापणी तोंडावर आली असताना सद्यस्थितीत परतीच्या वाटेवर असलेल्या पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भात कापणी रखडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात भात कापणीला सुरुवात झाली असताना परतीच्या पावसामुळे यात अडथळा येत आहे.

जिल्ह्यात गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. तर काही ठिकाणी तारांबळ उडवली आहे. काही ठिकाणी तर ढगफुटीप्रमाणे पाऊस पडत आहे.अशा ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.काही ठिकाणी भात शेती आडवी झाल्यामुळे भातांना कोंब आलेले आहेत. जिल्ह्यात सध्या हळवे भातपीक कापणीस तयार झाले आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी भातकापणीला सुरुवातही केली आहे. मात्र, गेले चार दिवस सायंकाळच्या सत्रात परतीचा पाऊस होत आहे. या वादळी पावसात भातशेती आडवी होऊन नुकसान झाले आहे.

परतीच्या पावसाने आडवी झालेली भातशेतीचा शासनाने पंचनामा करून योग्य ती नुकसान भरपाई द्यावी.अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
यावर्षी प्रथमच भातपिकाला एक रुपयात विमाकवच दिले आहे. मात्र, त्यातही अनेक क्लिष्टता आहे.भातपिकाचे नुकसान झाल्यास संबंधित विमा कंपनीला कळवावे लागते. यानंतर विमा कंपनीचा प्रतिनिधी येऊन पाहणी करून जीपीएस लोकेशनद्वारे फोटो घेणार व त्यानंतर नुकसानीप्रमाणे नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.भात पिकं आडवी झाल्यामुळे आणि पिकलेल्या भातपिकाचे अजून नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शासनाने ही क्लिष्ट पद्धत बंद करून आंबा, काजू,पिकाप्रमाणे सरसकट नुकसान भरपाई मंजूर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. अन्यथा शेतीची पुन्हा नुकसानीच पुनरावृत्ती अटळ आहे, अशी चित शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत.

अन्य जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतली जातात .मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाळी हंगामामध्ये भात पिकाशिवाय कोणतंही पीक घेतलं जात नाही. त्यामुळे सरकारने झालेल्या भात शेतीच्या नुकसानाकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रशासनाने लवकरात लवकर स्पॉट पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होताना पाहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here