सिंधुदुर्गतील चित्रकारांची विठुरायाचरणी कलात्मक सेवा अर्पण

0
260

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातल्या तीन चित्रकारांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठूरायाची अनोख्या पद्धतीने आराधना केली आहे.चित्रकार सुमन दाभोलकर, चित्रकार अल्पेश घारे, चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी विविध प्रकारे विठ्ठलाची कलाकृती साकारत आषाढी एकादशी साजरी केली आहे.

कणकवली मधील सुमन दाभोलकर यांनी आषाढी एकादशी च्या निमित्ताने विठ्ठलाच स्टोन आर्ट साकारल आहे. दगडांचा आकार न बदलता दगडांना जिवंत करत त्यांनी विठ्ठलाचं पोर्टेट दगडावर साकारलं आहे.

अनेक मूर्तिकार छिन्नी च्या साहाय्याने दगडाला आकार देत मूर्ती घडवतात. मात्र सुमन दाभोलकरने दगडाच्या मूळ आकाराला विविध रंगांची उधळण करत त्यांनी आज दगडावर विठ्ठलाचं रुप साकारलं आहे.

चित्रकार अल्पेश घारे याने वेंगुर्ले तालुक्यातील निवतीच्या निसर्गरम्य समुद्र किनाऱ्यावर फक्त रांगोळी व वाळूच्या सहाय्याने हातांच्या बोटांनी ३० फुट आकाराची विठ्ठलाची रांगोळी साकारली आहे.

अल्पेशने रांगोळीच्या सहाय्याने साकारलेलं विठ्ठलाचं हे मनमोहक रूप मनमोहून टाकत आहे. पंढरपुरची वारी आणि वारकऱ्यांनाप्रति असलेली भावना अल्पेशने आपल्या कलेच्या माध्यमातून समर्पित केली आहे.

चित्रकार अक्षय मेस्त्री यांची अनोखी विठ्ठल भक्ती समोर आली आहे. आषाढी एकादशी च्या निमित्ताने त्यांनी १६ विटांचा वापर करून प्रत्येक विटेवर पांडुरंगाचे मनमोहक चित्र रेखाटले आहे. आषाढी एकादशी निमित्त १६ विटेवर वेगवेगळी चित्रे काढण्याचा संकल्प अक्षय मेस्त्री याने केला होता, त्यानुसार त्याने प्रत्येक विटेवर विठूरायाचे आकर्षक चित्र रेखाटले आहे.

मागील वर्षी तुळशीच्या इवल्याशा पानावर अप्रतिम विठ्ठलाचे चित्र, शिवाय दीड एकर क्षेत्रात पॉवर ट्रीलरच्या साहाय्याने साकारलेला भव्यदिव्य पांडुरंग अख्या महाराष्ट्राने पाहिला होता. आता त्याने विटे मध्ये विठूरायाची अनेक आकर्षक चित्रे साकारली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here