सावंतवाडी संस्थान कालीन सामूहिक भात कापणीची साडे चारशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा

0
147

सिंधुदुर्ग – सावंतवाडी संस्थानचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ओटवणे मध्ये भातशेतीचे “नव्या” एक पारंपरिक पण ऐतिहासिक क्षण भातकापणी करून झाला. देव रवळनाथच्या कृपा आशिर्वादाने दरवर्षी हा क्षण आनंदाचे वातावरण निर्माण करतो.सुमारे साडे चारशे वर्षांची गौरवशाली ऐतिहासिक परंपरा असलेल्या ओटवणे येथील ‘नव्या’ चा अर्थात सामूहिक भात कापणीचा शुभारंभ पारंपारिक पद्धतीने करण्यात आला.या निमित्ताने या गावातील प्रत्येक घराच्या उंबरठ्यावर या नव्याच्या आकर्षक तोरणाचा साज सजला होता.

सावंतवाडी संस्थानातील ओटवणे गावात दरवर्षी नवे साजरे करण्याची प्रथा आहे यासाठी कुळघराकडे सकाळीच दवंडी देण्यात येते. त्यानंतर सकाळी कुळघराकडे ग्रामस्थ जमा होतात. यावर्षी गाव प्रमुख रविंद्र गावकर यांच्या भात पिकाची नव्यासाठी निवड करण्यात आली. नवे साजरे करण्याच्या ठिकाणी देवस्थानचे मानकरी सेवेकरी ग्रामस्थ आल्यानंतर ढोलाच्या गजरात हातातोंडाशी आलेल्या भातपिकाच्या पिकाच्या संवर्धनासाठी गाऱ्हाणे घालण्यात आले.

केसरे असलेली भातरोपे कापून ती कापडात लपेटून ग्रामस्थ पुन्हा सवाद्य कुळघराकडे आले आणि हे नवे घेऊन ग्रामस्थ आपल्या घरी मार्गस्थ झाले त्यानंतर पुन्हा या नव्याची गंध पुष्प पिंजर लावून पूजा करून हे नवे तोरणाच्या स्वरूपात आकर्षक सजविण्यात आले.भातशेती पीक आता दाणेदार बनत असतानाच या ” नव्या ” करण्याच्या उपक्रमाची शेतकरी वर्ग स्वागतपुर्व पुजा देखील करतात. सावंतवाडी संस्थानातील हि ऐतिहासिक परंपरा आजही जपली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here