संजय राऊतांच्या “त्या” वक्तव्या विरोधात वेंगुर्ले महिला भाजपाची पोलीस ठाण्यात तक्रार

0
125

सिंधुदुर्ग – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या मुलाखतीत भाजपा नेत्यांबद्दल बिभस्त, अश्लील व लैंगिक शेरेबाजी करणारे वक्तव्य केल्याने येथील महिला भाजपाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.

दरम्यान श्री.राऊत यांनी केलेल्या “त्या” विधानामुळे भाजपच्या महिला कार्यकर्त्यांचा अपमान झाला आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. याबाबत श्री.राऊत यांच्या विरोधात येथील पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

श्री.राऊत यांनी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना भाजपाच्या नेत्यांवर अश्लील शब्दात टीका केली. ही मुलाखत ऑनलाईन युट्यूब वर सुद्धा दिसत आहे.

त्यामुळे संबंधित क्लीप पहाताना आम्हा महीलांना स्त्री या नात्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांचे शब्द बिभस्त, अश्लील व आमच्या स्त्री मनास लज्जा उत्पंन्न करणारे वाटत असल्याने त्यांनी अशा प्रकारे लैंगिक शेरेबाजी करुन भाजपा पक्षाच्या सर्व महिला कार्यकर्त्यांची प्रतीमा मलीन केली आहे.

त्यामुळे त्यांच्या विरोधात कलम ३५४ – अ ( १ ) ( ४ ) , ५०९ , ५०४ , ५०० भा .द.वी.नुसार गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

यावेळी वेंगुर्ले नगरपरिषद उपनगराध्यक्षा कु.शितल आंगचेकर , महीला मोर्चा च्या जिल्हा.सरचिटणीस सौ.सारीका काळसेकर , ता. सरचिटणीस व्रुंदा गवंडळकर , नगरसेविका श्रेया मयेकर , नगरसेविका साक्षी पेडणेकर , नगरसेविका ईशा मोंडकर , सौ.रसीका मठकर व सौ.हेमांगी प्रताप गावसकर इत्यादी महिला मोर्चा च्या पदाधिकारी उपस्थित होत्या .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here