लॉकडावून करण्याच्या आधी गरिबांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा करा भाजपा नेते प्रमोद जठार यांचा राज्य सरकारला सल्ला

0
124

 

सिंधुदुर्ग – राज्यात कोविडचे फसलेले नियोजन आणि ठाकरे सरकारचा मंत्र्यांवरील सुटलेला ताबा यामुळे राज्यात लॉकडाऊन सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. असा आरोप भाजपचे प्रदेश सचिव व माजी आमदार प्रमोद जठार यांनी केला आहे. भाजप कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन होऊ देणार नाही, असा इशारा देतानाच लॉकडाऊन करायचेत असेल तर सामान्य जनतेच्या खात्यात दहा हजार रुपये जमा करा, अन्यथा वेगळा पर्याय शोधा, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.

यावेळी बोलताना भाजपचे प्रदेश सचिव माजी आमदार प्रमोद जठार पुढे म्हणाले, खरं म्हणजे या कोविडच्या काळातील ठाकरे सरकारकडून जे नियोजन योग्य प्रकाराने व्हायला हवं. त्या नियोजनात आलेलं अपयश आणि त्यांचे मंत्र्यांवरती सुटलेला ताबा आणि कुठल्याही प्रकारचं या शासन-प्रशासनावरचे सुटलेले नियंत्रण या सगळ्याचा परिपाक म्हणजे पुन्हा लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती निर्माण व्हायला कारणीभूत झाले. परंतु भारतीय जनता पक्षाचे या ठाकरे सरकारला ठणकावून सांगणे आहे की, आम्ही आता लॉकडाऊन सहन करणार नाही. असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.

जठार पुढे म्हणाले, जर तुम्हाला लॉकडाऊन संपूर्ण महाराष्ट्रात करायचा असेल तर गरिबांच्या खात्यामध्ये पहिले दहा हजार रुपये जमा करा आणि मगच लॉकडाऊन करा. अन्यथा लॉकडाऊनचे इतर पर्याय वापरा. तुम्हाला भारतीय जनता पक्ष पूर्ण सहकार्य करायला तयार आहे. विरोधी पक्ष म्हणून तुमच्या सोबत आहे. परंतु लसीकरणाचे प्रकरण असू दे किंवा इतर सगळ्या गोष्टी असोत याच्यामध्ये हे शासन पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. किमान डॉक्टर असतील, परिचारिका असतील आणि इतर सगळी मंडळी असतील किंवा यात पोलिस कर्मचारी असतील या सगळ्यांचे पगार सुद्धा वेळेवर देता आले तर पाहा. त्यांना अ‌ॅडव्हान्स पगार द्या. परंतु कोविडमध्ये आलेली शिथिलता पाहता हे लॉकडाऊनकडे वळलेले सरकार आहे. आमचा याला पूर्ण विरोध आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here