रक्त नमुना तपासणी विभागात आवश्यक मशीनरी तात्काळ पुरवा आ. वैभव नाईक यांची पालकमंत्री,जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

0
103

सिंधुदुर्ग – ओरोस जिल्हा रुग्णालयातील रक्त नमुना तपासणी विभागात आमदार वैभव नाईक यांनी आज भेट देऊन कोरोना रुग्णांच्या केल्या जाणाऱ्या रक्त तपासणीचा आढावा घेतला. पॅथॉलॉजी प्रयोगशाळेत उपलब्ध नसलेल्या सीबीसी काउंट मशीन, रक्त नमुना संग्रहित करण्यासाठी रेफ्रिजेटर, रक्त नमुने तपासणीसाठी जिल्हा रुग्णालय येथे फुल्ली ऑटोमेटेड रँडम ऍक्सेस बायोकेमिस्ट्री ऍनालायझर ह्या मशीन ताबडतोब उपलब्ध करण्याबाबतची मागणी आ. वैभव नाईक यांनी पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्याकडे केली आहे.लवकरात लवकर ह्या मशीन उपलब्ध करण्याची ग्वाही पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

यावेळी रक्त नमुना तपासणी विभागातील अडचणी व समस्या आ. वैभव नाईक यांनी लॅब टेक्निशियन कडून जाणून घेतल्या. योग्य उपचार करण्याच्या दृष्टीने कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्या व्यक्तींची रक्त तपासणी होणे गरजेचे आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कोविड रुग्णांचे ब्लड रिपोर्ट करण्याच्या सूचना आ. वैभव नाईक यांनी यावेळी दिल्या.यावेळी लॅब टेक्निशियन किशोर गुरनुले, लॅब टेक्निशियन प्रियांका कांबळी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here