…म्हणून मुख्यमंत्री पिंजर्‍यातून बाहेर पडत नाहीत खासदार नारायण राणे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

0
140

सिंधुदुर्ग – आगामी काळात कोकणातील शिवसेनेच्या ११ हि आमदारांना घरी बसवणार. कोकणातून शिवसेनेला हद्दपार करणार असे सांगतानाच शिवसेनेचे आमदार किती? असा सवाल लोक विचारतील म्हणून मुख्यमंत्री पिंजर्‍यातून बाहेर पडत नाही असा टोला भाजपा खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

कुडाळ येथे भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक खासदार राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकी नंतर राणे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी माजीमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नीतेश राणे, माजी खासदार निलेश राणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले, कि कोकणातील ११ आमदार विधानसभेत कधी कोकणातील विकासा संदर्भात बोलतात का? जाहीर केलेला फंड ही हे सरकार देत नाही त्यामुळे हे आमदार काही करू शकत नाहीत. पालकमंत्री तर निष्क्रिय आहे, काही कामाचा नाही. तो जिल्ह्यात येऊन काय काय करतो ते एक दिवस सांगेन. मात्र आता आम्ही ठरवलय कोकणाचा विकास थांबता कामा नये तो पुर्ववत चालू राहीला पाहीजे म्हणून देणार नसतील तर भारतीय जनता पार्टी या सरकार विरोधात आंदोलन करणार.असेही ते म्हणाले. शिवसेनेचे काय १४५ आमदार निवडूण आले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नाहीत म्हणून लोकं त्याला आता विचारतील तुझे आमदार किती ? म्हणून उध्दव ठाकरे पिंज-यातून बाहेर पडत नाही. असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

मुख्यमंत्र्याचं जे म्हणन आहे की राज्याचा Gst जो केंद्राकडे आहे तो आल्यावर आम्ही मदत करू. पण माझ्या माहिती प्रमाणे ते पैसे आलेले आहेत. केंद्रीय अर्थ मंत्र्यांनी तेव्हा सांगितलं होतं की आम्ही पैसे देण्या अगोदर तुम्ही खर्च करा. केंद्र सरकार व्याजा सकट ते पैसे देईल त्यामुळे केंद्राने अडवलं नाही.
घटने प्रमाणे जेव्हां सरकार स्थापन झालं तेव्हाचं त्यांना डेव्हलपमेंट साठी लागणारे पैसे त्यांनी रिसोर्सेस ने मिळावावेत यासाठी कायद्यामधे तरतूदी आहेत. प्रत्येक वेळेला पैशाची गरज लागली की केंद्राकडे बोट दाखवण्याची गरज नाही. नैसर्गिक आपत्तीत केंद्र सरकार मदत आजही करत. आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचे पैसे सरकारने निर्माण करावे आणि मदत द्यावी एवढी अक्कल नाही आहे त्यांना असाही ते म्हणाले.

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर साधला निशाणा

कोण आहे तो, कोकणाचं काय माहिती आहे त्याला, महसुल राज्यमंत्र्याला काय अधिकार आहेत, महसूलमंत्री कोंग्रेसचा हा राज्यमंत्री शिवसेनेचा कोण विचारतय, काहीही बोलतो. मी ओळखतो त्याला गेली चाळीस वर्ष पाहिला अशोक चव्हाण यांच्या बरोबर फिरायचा. असे ते यावेळी बोलताना म्हणाले.

वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधी कोठून आणणार

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार अशी फक्त शिवसेनेने घोषणा केली. मात्र या वैद्यकीय महाविद्यालयासाठी जमीन कुठे? तसेच निधी कुठून देणार? याची तरतूद केली नाही. या महाविद्यालयाची परवानगी ही केंद्र सरकार देते राज्य सरकार परवानगी देत नाही जिल्ह्याला विकास निधी देऊ न शकणारे हे सरकार सुमारे २५० कोटी रुपयांचा निधी हॉस्पिटलला कसा काय देणार? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here