मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला रायगडच्या शुभ्रा जाधव हिचा तात्काळ प्रतिसाद नर्स म्हणून देशसेवा करण्याची दर्शवली तयारी

0
123

 

वैद्यकीय प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींना ‘कोरोना’विरुद्धच्या युद्धात सामील होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे. माझं नर्सिंगचं प्रशिक्षण झालं आहे, असा तात्काळ प्रतिसाद देत रायगडच्या शुभ्रा संदेश जाधव हिने नर्स म्हणून देशसेवा करण्याची तयारी दर्शवली आहे.

रायगड जिल्ह्यात अलिबाग मधील चोंढी तालुक्यात राहणाऱ्या शुभ्रा संदेश जाधव यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. ‘माझे नर्सिंग प्रशिक्षण पूर्ण झाले असून लग्नानंतर सध्या घरीच आहे. मुख्यमंत्र्यांनी देशसेवा करण्यासाठी केलेल्या आवाहनानुसार आपण अलिबाग तालुक्यात नर्स म्हणून काम करण्यास तयार आहोत’, अशा आशयाचा ईमेल त्यांनी पाठवला आहे. नर्सिंग सर्टिफिकेटही त्यांनी या मेलमध्ये जोडली आहेत.

राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एक सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 1100 च्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यादृष्टीने राज्य सरकार काय काय पावलं उचलत आहे, त्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यावेळी देशसेवेत सामील व्हा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here